शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
2
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
3
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
4
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
5
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
6
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
7
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
8
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
9
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
10
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
11
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
12
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
13
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
14
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
15
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
16
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
18
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
19
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
20
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
Daily Top 2Weekly Top 5

...तर 'तराजू'वरील विश्वास कमी होईल - उद्धव ठाकरे

By admin | Updated: May 15, 2015 09:32 IST

सरकारी जाहिरातींमध्ये कोणाचे फोटो झळकतील याचा निर्णयही देशाची न्याययंत्रणाच घेणार असेल तर आता लोकांचा 'तराजू'वरील विश्वास कमी होईल असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि.१५ - सरकारी जाहिरातींमध्ये कोणाचे फोटो झळकतील याचा निर्णयही देशाची न्याययंत्रणाच घेणार असेल तर आता लोकांचा 'तराजू'वरील विश्वास कमी होईल असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडला आहे. सलमान खानला झटपट जामीन देणारी न्यायव्यवस्था साध्वी प्रज्ञा, कर्नल पुरोहित यांच्या सारख्यांना तातडीने जामीन का देत नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 

सरकारी जाहिरातींमध्ये फक्त पंतप्रधान, राष्ट्रपती व सरन्यायाधीश या तिघांचेच फोटो झळकू शकतील, मुख्यमंत्री व अन्य नेत्यांना सरकारी जाहिरातींमध्ये झळकता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निकाल सुप्रीम कोर्टाने दिला होता. या निकालावर उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून नाराजी व्यक्त केली आहे. लोकशाहीचा डंका वाजवून, ऊन-पावसात मतदान करून ‘विधानसभा’ निर्माण कशाला निर्माण करायची व त्याच लोकशाहीचे कंबरडे मोडणारे निर्णय न्यायपालिकांनी द्यायचे याकडेही त्यांनी लक्ष वेधले. जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७०, बेळगाव सीमाप्रश्न अशा अनेक प्रकरणांवर अद्याप निकाल देण्यात आलेला नाही, न्यायालयांनी आधी यावर निकाल द्यावा असेही त्यांनी म्हटले आहे.