शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यसंमेलनाचे पडघम

By admin | Updated: October 29, 2016 03:04 IST

नाट्यसृष्टीचा वार्षिक मेळा म्हणून ओळख असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे पडघम आता वाजू लागले आहेत. २०१७च्या सुरुवातीला होऊ घातलेले अखिल भारतीय

- राज चिंचणकर, मुंबईनाट्यसृष्टीचा वार्षिक मेळा म्हणून ओळख असलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे पडघम आता वाजू लागले आहेत. २०१७च्या सुरुवातीला होऊ घातलेले अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे ९७ वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन उस्मानाबाद वा नागपूर येथे होणार असल्याची चर्चा नाट्यवर्तुळात सुरू आहे.यंदा ठाणे मुक्कामी पार पडलेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनानंतर, पुढचे नाट्यसंमेलन कुठे होणार याविषयी उत्सुकता होती. मधल्या काळात नाट्य परिषदेकडे ९७ वे नाट्यसंमेलन भरवण्यासाठी नाट्य परिषदेच्या उस्मानाबाद, नागपूर व जळगाव या शाखांकडून निमंत्रणे आली. त्यातून उस्मानाबाद आणि नागपूर यापैकी एका ठिकाणी नाट्यसंमेलन आयोजित करण्याबाबत नाट्य परिषदेचा विचारविनिमय सुरू आहे. तरीही यातून नाट्यसंमेलन भरवण्यासाठी उस्मानाबादचे नाव आघाडीवर असल्याचे समजते. त्यामुळे ९७ व्या नाट्यसंमेलनाची माळ उस्मानाबादच्या गळ्यात पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह दीपक करंजीकर यांच्याशी संपर्क साधला असता, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या नाट्य परिषदेच्या बैठकीत ९७ व्या नाट्यसंमेलनाचे ठिकाण निश्चित होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.नाट्यसंमेलनाध्यक्षांची निवड...९७ व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेला नाट्य परिषदेने प्रारंभ केला असून, या प्रक्रियेच्या अंतर्गत नाट्य परिषदेने सभासदांकडून नावे मागवली आहेत. इच्छुक सदस्यांनी त्यांचे सूचनापत्र, सूचित व्यक्तीच्या लेखी संमतीसह; तसेच सूचक व अनुमोदक यांच्या स्वाक्षरीसह नाट्य परिषदेच्या माहीम, मुंबई येथील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात असलेल्या मध्यवर्ती कार्यालयात ५ नोव्हेंबरपर्यंत पाठवण्याचे आवाहन नाट्य परिषदेने केले आहे.