पक्ष-चिन्ह बळकावलं, पण पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे! रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 09:59 PM2024-02-06T21:59:36+5:302024-02-06T22:00:02+5:30

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे देण्याचा निर्णय घेतला आहे.

The party-symbol has been stolen, but father of the party is with us! Rohit Pawar's first reaction | पक्ष-चिन्ह बळकावलं, पण पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे! रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया

पक्ष-चिन्ह बळकावलं, पण पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे! रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया

बारामती- आज सत्तेचा गैरवापर करुन पक्ष आणि चिन्ह जरी बळकावलं असलं तरी पक्षाचा बाप आमच्यासोबत आहे, लडेंगे और जितेंगे, अशा शब्दात आमदार रोहित पवार यांनी त्यांची प्रतिक्रीया सोशल मिडीयावर व्यक्त केली आहे.

आजच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष आणि चिन्हाच्या निर्णयानंतर आमदार रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केेली आहे. ते म्हणतात, केंद्रातील महाशक्तीच्या बेलगाम सत्तेचा गैरवापर करुन फुटीर गट व्यक्तीगत स्वार्थासाठी पक्ष बळकावण्याचा असंवैधानिक निर्णय घेऊ शकतो. परंतु आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या वर वाढवणं, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देणं, मंबईचं महत्त्व अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणं, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणं, राज्यातील हक्काचे प्रकल्प राज्यातच टिकवून ठेवणं,असे महाराष्ट्राच्या हिताचे कायदेशीर निर्णय केंद्रातील महाशक्तीचा वापर करुन सामान्य लोकांच्या हितासाठी मात्र त्यांना घेता येत नाहीत, यातच त्यांची लायकी कळते,अशा शब्दात पवार यांनी आजच्या निर्णयावर टीका केली आहे.

सुप्रिया सुळे म्हणतात...

अदृष्य शक्तीने दिलेला हा निर्णय आहे. ज्या व्यक्तीने पक्ष काढला, त्याच्या हातातून पक्ष काढून घेण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे. तुमचे घर गावी असेल, ते वडिलांचे आहे, तुम्ही त्यांना बाहेर काढणार का, असा सवालही सुळे यांनी पत्रकारांना विचारला. आमदारांच्या संख्येवरून निकाल दिल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या संख्येवरून पक्ष कोणाचा हे ठरविता येणार नाही, असा एक निकाल दिलेला आहे. यामुळे आयोगाच्या या निकालाविरोधात आम्ही सर्वोच्च न्य़ायालयात जाणार असल्याचे सुळे म्हणाल्या. 

Web Title: The party-symbol has been stolen, but father of the party is with us! Rohit Pawar's first reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.