शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
4
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
5
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
6
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मरची लागेल!
7
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
10
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
11
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
12
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
13
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
14
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
15
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
16
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
17
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
18
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
19
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
20
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: चंद्रावर झळकणार वाटेगावच्या मुलांची नावे; 'नासा'च्या आर्टेमिस -२ मोहिमेत जिल्हा परिषदेच्या शाळेला मिळाला मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 14:38 IST

अशी असेल मोहीम

धोंडीराम कुंभारवाटेगाव (जि.सांगली) : ‘नासा’ या आंतरराष्ट्रीय अवकाश संशोधन संस्थेच्या ‘आर्टेमिस-२’ मोहिमेशी सांगली जिल्ह्यातील वाटेगावच्या जिल्हा परिषद शाळेशी नाते जोडले गेले आहे. चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या यानावर येथील मुलांची अन् शिक्षकांची नावे झळकली जाणार आहेत. या विद्यार्थ्यांच्या नावांचे बोर्डिंग पासेस ‘नासा’कडून दिले आहेत. हा क्षण शाळेसाठी ऐतिहासिक ठरणार आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!या मोहिमेत व्हर्चुअल गेस्ट म्हणून सहभागी होण्याबाबत नासाने आवाहन केले होते. या उपक्रमात नासाकडून केलेल्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून जिल्हा परिषद शाळा नं. १ वाटेगाव या शाळेने नोंदणी केली होती. विद्यार्थ्यांची नोंदणी झाल्यानंतर नासाकडून विद्यार्थी आणि शिक्षकांचे बोर्डिंग पासेस पाठवले. या बोर्डिंग पासेसचे वितरण मंगळवारी शाळेत विद्यार्थ्यांना केले.नासाच्या या मोहिमे अंतर्गत सेंड युअर नेम टू द मून ही संकल्पना राबविली आहे. या उपक्रमात वाटेगावच्या मुलांना सहभागी करून घेण्यात आले आहे. नासाच्या अधिकृत पोर्टलवर ही नावे नोंदली गेली आहेत. चंद्राभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या यानावर या विद्यार्थ्यांची नावे असणार आहेत. एसडी कार्डद्वारे ती झळकणार आहेत.त्यांना मोहिमेचे प्रक्षेपणही व्हर्च्युअली पाहता येणार आहे. वाटेगाव जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विकास पाटील, पद्मश्री राजाराम राजमाने, प्रसाद हसबनीस आणि विद्या पाटील यांच्यासह सर्व विद्यार्थी यांचे बोर्डिंग पासेस विद्यार्थ्यांच्या हाती दिले. या उपक्रमामागे शाळेतील प्रसाद हसबनीस यांची कल्पकता आणि विद्यार्थ्यांचा विकास करण्यासाठीची धडपड दिसून येते.

अशी असेल मोहीमआर्टेमिस-२ ही मोहीम एप्रिल २०२६ पूर्वी फ्लोरिडातील नासाच्या ‘केनेडी स्पेस सेंटर’ येथून प्रक्षेपित होईल. अंतराळवीर चंद्राच्या पलीकडे समारे ६ लाख ८५ हजार मैल प्रवास करून पॅसिफिक महासागरात परतणार आहेत. याची माहिती जगभरातील सर्वसामान्य जनतेला व्हावी यासाठी नासाने हा उपक्रम आयोजित केला आहे.

उपक्रमाबाबत शिक्षणाधिकाऱ्यांकडून कौतुकया उपक्रमाबद्दल शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, गटशिक्षणाधिकारी सुनील आंबी, विस्तार अधिकारी छायादेवी माळी, केंद्रप्रमुख वसंत शिंगारे यांनी शाळेतील शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

विद्यार्थ्यांना या बालवयात अंतराळ मोहीम, आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक, अंतराळवीर यांची माहिती व्हावी, त्यांच्या डोळ्यांत स्वप्ने पेरली जावीत, म्हणून आम्ही हा उपक्रम आयोजित केला आहे. - प्रसाद हसबनीस, शिक्षक, वाटेगाव 

आर्टेमिस मोहिमेची समग्र माहिती, अंतराळात गुरुत्वाकर्षणविरहित वातावरणात अंतराळवीर कसे राहतात, कसे खातात, कसे झोपतात, हे सर्व विद्यार्थ्यांना माहीत व्हावे, म्हणून आम्ही नासाच्या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती दिली आहे. - विकास पाटील, मुख्याध्यापक

English
हिंदी सारांश
Web Title : Wategaon students' names to shine on the moon with NASA's Artemis-2

Web Summary : Wategaon school students' names will journey to the moon on NASA's Artemis-2 mission. The school registered as a virtual guest, receiving boarding passes for students and teachers. This initiative aims to inspire students about space exploration and science.