"पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जिर्णोद्धार केलेला मणिकर्णिका घाट तोडला"; रोहित पवारांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 21:52 IST2026-01-14T21:46:17+5:302026-01-14T21:52:11+5:30
रोहित पवार यांनी उत्तर प्रदेश सरकारकडे मागणी केली आहे की, हा घाट तात्काळ पूर्ववत बांधण्यात यावा आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्र सरकारनेही लक्ष घालून हस्तक्षेप करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.

"पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी जिर्णोद्धार केलेला मणिकर्णिका घाट तोडला"; रोहित पवारांचा आरोप
वाराणसी येथील गंगेच्या काठावर असलेला मणिकर्णिका घाट हा ऐतिहासिक घाट स्थानिक प्रशासनाने तोडल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली. यामध्ये त्यांनी संताप व्यक्त केला असून ही कृती अत्यंत निषेधार्ह असल्याचे म्हटले आहे.
आमदार रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, हा घाट केवळ एक वास्तू नसून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या उत्तुंग कर्तृत्वाचा अनमोल ऐतिहासिक ठेवा आहे. अशा ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याऐवजी तो उद्ध्वस्त केला जात असेल, तर ही बाब अत्यंत चुकीची असून दैदिप्यमान इतिहास पुसण्याचा गुन्हा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रोहित पवार यांनी उत्तर प्रदेश सरकारकडे मागणी केली आहे की, हा घाट तात्काळ पूर्ववत बांधण्यात यावा आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्र सरकारनेही लक्ष घालून हस्तक्षेप करावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.
वाराणसीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी जिर्णोद्धार केलेला गंगेच्या काठावरील मणिकर्णिका घाट स्थानिक प्रशासनाने तोडला असून ही कृती अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे. या केवळ एक वास्तू नाहीत तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या उत्तुंग कर्तृत्त्वाचा अनमोल ठेवा आहेत.… pic.twitter.com/ooNqXwlMrs
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 14, 2026