शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
2
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
3
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
4
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
5
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
6
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
7
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
8
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
9
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
10
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
11
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
12
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
13
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
14
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
15
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
16
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
17
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
18
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

अपार दुःखाचे दान मिळालेले शापित गंधर्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 11:00 IST

Asha Bhosle News: मी प्रथम गायक होतो व कालांतराने संगीतकार झालो. यामुळेच की काय मला लतादीदी असी की आशाताई यांना चाली समजावून सांगताना सोपे जायचे. असेदेखील एक- दोन वेळा झाले आहे की, मी दिलेली चाल आशाताईला रुचली नाही व तिने आडमार्गाने ती गायला नकार दिला आहे.

- हृदयनाथ मंगेशकर(ज्येष्ठ संगीतकार व आशाताईंचे बंधू)मी प्रथम गायक होतो व कालांतराने संगीतकार झालो. यामुळेच की काय मला लतादीदी असी की आशाताई यांना चाली समजावून सांगताना सोपे जायचे. असेदेखील एक- दोन वेळा झाले आहे की, मी दिलेली चाल आशाताईला रुचली नाही व तिने आडमार्गाने ती गायला नकार दिला आहे. मी तिच्या मताचा आदर करत रेकॉर्डिंगदेखील कॅन्सल केले आहे.

बरेचदा भी आशा व लताचा भाऊ म्हणून माझी हेटाळणी व्हायची. ह्याला काय कमी आहे? बहिणींच्या जीवावर मस्त जगू शकतो हा! पण मी कधीही असा विचार केला नाही. मी माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून होतो. ‘जीवलगा’ गाण्याच्या रेकॉर्डिंगला आशाताई वेळेत पोहोचली पण मला उशीर झाला होता. कारण ती तिच्या कारमधून आली तर मी धक्के खात बसमधून. आम्हा बहीण-भावामध्ये आत्मसन्मान जपणारे नाते होते.

‘जीवलगा’ हे गाणे अनेक अर्थांनी आम्हा भाऊ-बहिणीच्या जीवनात महत्त्वाचे आहे. हे गाणे गाताना आशाताई त्या गाण्यामध्ये इतकी गुंतली होती की तिच्या डोळ्यांमध्ये टचकन पाणी आले होते व दैव-दुर्विलास बघा या गाण्याच्या रेकॉर्डिंगनंतरच आशाताईंच्या यजमानांच्या (गणपतराव भोसले) निधनाची बातमी धडकली होती.

माझे असे स्पष्ट मत आहे की आशाताईसारखा संगीत क्षेत्रातील असो, की अन्य कुठल्याही क्षेत्रातील दुसरा कोणी मोठा कलाकार; केवळ नैसर्गिक देणगी मिळाली म्हणून ते कलाकार मोठे होत नाहीत तर नियतीने त्यांच्या पदरात टाकलेल्या अपार दुःखाच्या दानाने ते मोठे होतात. 

कलाकाराच्या हृदयात / मनात सतत सलणाऱ्या काट्याची सल त्याच्या कलेत नकळत ठिबकते व मग समोरच्या माणसालादेखील ती जाणवते आणि आपलीशी वाटते. आशाताई हिच्या शब्दांमध्येच सांगायचे झाल्यास आम्ही मंगेशकर भावंडे ‘शापित गंधर्व’ म्हणून या भूतलावर आलो आहोत. गंधर्व हे शापित असल्याने गाणे व दुःख दोन्ही दाणे आमच्या पदरात देवाने भरपूर घातले आहेत...    (‘सरस्वामिनी आशा’ पुस्तकातून साभार)

English
हिंदी सारांश
Web Title : A Cursed Gandharva: Gifted with Immense Sorrow, a Musical Journey

Web Summary : Hrudaynath Mangeshkar reflects on his bond with Asha Bhosle, her talent, and the pain that fuels great artistry. "Jiwalaga" became deeply emotional for Asha, coinciding with her husband's passing. Artists' greatness stems from their ability to channel suffering into art.
टॅग्स :Asha Bhosaleआशा भोसलेHridaynath Mangeshkarहृदयनाथ मंगेशकर