शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे-मुंबईला टोलनाक्यांचा विळखा कायम

By admin | Updated: June 1, 2015 04:38 IST

राज्यातील १२ टोलनाके जूनपासून बंद करण्याचा मुहूर्त शासनाने दीड महिन्यापूर्वी घोषित केला आहे. पण, या यादीत मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील एकाही टोलनाक्याचा समावेश

सुरेश लोखंडे -  ठाणेराज्यातील १२ टोलनाके जूनपासून बंद करण्याचा मुहूर्त शासनाने दीड महिन्यापूर्वी घोषित केला आहे. पण, या यादीत मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील एकाही टोलनाक्याचा समावेश नाही. त्यामुळे विरोधीपक्ष असताना टोलला विरोध करणाऱ्या सत्ताधाऱ्यांकडूनसुद्धा मुंबई-ठाणेकरांच्या तोंडाला पाने पुसल्याचे उघड झाले आहे.रस्त्यावरील खर्चापेक्षा जास्त रकमेची वसुली टोलनाक्यांद्वारे होत असल्याचा आरोप सातत्याने झाला. मुंबईला जाण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी राज्यात सर्वाधिक टोलनाक्यांचा विळखा ठाण्यासह नव्या पालघर जिल्ह्यात सुमारे १६ ठिकाणी आहे. त्यांच्या विरोधात सातत्याने रस्त्यावर उतरणारी शिवसेना-भाजपा आता सत्तेवर असतानाही त्यांच्याकडून या दोन्ही जिल्ह्यांतील एकही टोलनाका बंद करणे शक्य झाले नाही. यामुळे विरोधी पक्षाच्या बाकावर बसून टोल बंद करण्यासाठी केलेली आंदोलने केवळ ‘चिथावणी देणारी’ ठरले आहे. सत्ताधारी शिवसेना-भाजपाच्या आमदारांनी पूर्वी टोलच्या जिझिया कराविरोधात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे कामकाज बंद पाडून सभात्याग केल्याचे अद्याप स्मरणात आहे. जिल्ह्यातील ही टोलधाड नष्ट करण्यासाठी सध्याचे पालकमंत्री व बांधकाममंत्री एकनाथ शिंदे सत्तेत असतानाही अपयशी ठरल्याचे राजकीय धुरीणांकडून ऐकायला मिळत आहे. ठाणे-पालघरच्या १६ टोलनाक्यांपैकी ग्रामीण भागालगतच्या ५ नाक्यांवर कार, जीप व एसटी बसेसचा टोल घेणे बंद करण्याचे घोषित करण्यात आले. मात्र, एकही नाका कायमचा बंद करण्यात न आल्यामुळे नागरिकांच्या पदरी निराशा आली आहे. त्यातच मुंबईत जाण्यासाठी महत्त्वाचे प्रवेशद्वार म्हणून भूमिका बजावत असलेल्या ठाणे शहरालगतचे टोलनाके बंद करण्यात आले नाहीत. बंद केलेले व कार, जीप, बसला सवलत दिलेले टोलनाके सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळ आणि एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प आदींच्या नियंत्रणातील आहेत. ठाणे, पालघर जिल्ह्यांत उभ्या करण्यात आलेल्या सुमारे १६ टोलनाक्यांपैकी ५ टोलनाके सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहेत. ५ टोलनाके महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंळाचे असून, उर्वरित ५ टोलनाके राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नियंत्रणातील आहेत. यापैकी बंद केलेल्या नाक्यांमध्ये एकाही खाजगी कंपनीच्या टोलनाक्याचा समावेश नाही.