Thane has more current corona patient than Mumbai; kalyan in also added | मुंबईपेक्षा ठाणेच कोरोनामुळे अधिक बेजार; उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा मोठा

मुंबईपेक्षा ठाणेच कोरोनामुळे अधिक बेजार; उपचार घेत असलेल्या रुग्णांचा आकडा मोठा

मुंबई – देशभरासह राज्यात मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या अधिक असल्याचे म्हटले जात होते. मात्र आता मुंबईतील कोरोनाच्या संसर्गाचे स्थित्यंतर होत असल्याचे निरीक्षणास आले आहे. मुंबईच्या तुलनेत ठाण्यात अधिक सक्रिय रुग्ण असल्याचे दिसून आल आहे. मुंबईत २३ हजार ७८५ कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत, तर ही संख्या ठाण्यात ७ हजारांनी अधिक आहे. ठाण्यात ३० हजार ५०६ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

ठाण्यात ५४ हजार ८१९ कोरोना बाधित आहेत, तर २२ हजार ८२१ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ४८३ मृत्यूंची नोंद झाली आहे. मागील आठवड्यभरापासून ठाण्यातील रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याचे दिसून आले आहे. ठाणे जिल्ह्यात ७ हजार ३५० , ठाणे मनपा हद्दीत १३ हजार ३८१, नवी मुंबई मनपा क्षेत्रात ९ हजार ८८९ आणि उल्हासनगर महानगरपालिकेच्या क्षेत्रात ३ हजार ५६३ कोरोना बाधित आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ५१६ कोरोना रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. ठाणे महानगरपालिका व कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांची संख्या सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. 

मुंबईत ८९ हजार १२४ रुग्ण, ६० हजार १९५ रुग्ण कोविडमुक्त

मुंबईत गुरुवारी १ हजार २६८ रुग्ण, तर ६८ मृत्यूंची नोंद झाली. शहर उपनगरात कोरोना बाधितांची संख्या ८९ हजार १२४ झाली आहे. तर बळींचा आकडा ५ हजार १३२ झाला आहे. अन्य कारणांमुळे आतापर्यंत १२ मृत्यू झाले आहेत. मुंबईत एकूण ६० हजार १९५ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. विविध रुग्णालयांत २३ हजार ७८५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

पुरुष रुग्णांचे सर्वाधिक बळी

राज्यातील कोरोनाच्या रुग्णांनी दोन लाखांचा आकडा पार केला आहे. या आकडेवारीचा विचार करता, राज्यातील एकूण रूग्णसंख्येपैकी 62 टक्के रूग्ण हे पुरुष असून 38 टक्के महिला रूग्ण आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या आकडेवारीनुसार ७ जुलैपर्यंत राज्यात २ लाख ३० हजार ५९९ रूग्ण कोरोनाबाधित झाले असून यातील १ लाख ३० हजार १०४ रूग्ण हे पुरुष आहेत. तर ८१ हजार ४१ महिला रूग्ण आहेत. तर, मृतांमध्ये ६५ टक्के पुरुष असून ३५ टक्के महिलांचा समावेश आहे. या माहितीवरून पुरुष कोरोनाचे सर्वाधिक बळी ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

रेल्वेकडेही पैशांची वानवा? कंत्राटी कामगारांचे वेतन तीन महिन्यांपासून थकले; जेवणाचेही हाल

महाराष्ट्रासमोर आव्हान! कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढायला लागली; दिवसभरात 219 बळी

मोठी बातमी! ICSE बोर्डाचे 10 वी, 12वीचे निकाल उद्या जाहीर होणार

कोरोनामुळे अमेरिकेत हाहाकार; दर आठवड्याला 13 लाख कामगारांवर बेरोजगारीचे संकट

भाजपच्या नरेंद्र मेहतांची नागरिकास अश्लिल, अर्वाच्च शिवीगाळ; हेल्पलाईनवर केलेली तक्रार

परीक्षा नाही, केवळ एक मुलाखत अन् सरकारी नोकरी; 43000 रुपये पगार

भारताने फोडले, अमेरिकेने घेरले! घाबरलेला चीन रशियाला शरण गेला, गयावया करू लागला

सप्टेंबर काय, नोव्हेंबरपर्यंत विद्यापीठांच्या परीक्षा होणे अशक्य; उदय सामंत यांचे युजीसीवर स्पष्टीकरण

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Thane has more current corona patient than Mumbai; kalyan in also added

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.