Challenge before Maharashtra! 6875 new #COVID19 positive cases, 219 deaths | महाराष्ट्रासमोर आव्हान! कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढायला लागली; दिवसभरात 219 बळी

महाराष्ट्रासमोर आव्हान! कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढायला लागली; दिवसभरात 219 बळी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई – राज्यात गुरुवारी ६ हजार ८७५ कोरोना रुग्णांचे निदान झाले, तर २१९ मृत्यूची नोंद झाली. राज्यात कोरोना बाधितांची संख्या २ लाख ३० हजार ५९९ झाली असून बळींचा आकडा ९ हजार ६६७ झाला आहे. सध्या राज्यात ९३ हजार ६५२ रुग्णांवर उपचार सुरु असून आतापर्यंत १ लाख २७ हजार २५९ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.१९ टक्के झाले असून मृत्यूदर ४.१९ टक्क्यांवर आला आहे. गुरुवारी २१९ मृत्यूंची नोंद झाली. त्यात मुंबईतील ६८, ठाणे ८, ठाणे मनपा २०, नवी मुंबई मनपा ५, कल्याण डोंबिवली मनपा १८, उल्हासनगर मनपा ३, भिवंडी निजामपूर मनपा ९, मीरा भाईंदर मनपा ३, पालघर १, वसई विरार मनपा ७, रायगड ९, पनवेल मनपा ८, नाशिक ३, नाशिक मनपा १, अहमदनगर १, अहमदनगर मनपा १, जळगाव ६, जळगाव मनपा १, नंदूरबार २, पुणे २, पुणे मनपा १८, पिंपरी चिंचवड मनपा ७, सोलापूर ४, सोलापूर मनपा ४, सातारा ३, जालना १, लातूर मनपा १, नांदेड १, अमरावती मनपा १, नागपूर १, नागपूर मनपा १, अन्य राज्य/ देशातील १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दिवसभरात ४ हजार ६७ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १२ लाख २२ हजार ४८७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी  १८.८६ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख ४९ हजार २६३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात आहेत. तर ४८ हजार १९१ व्यक्ती संस्थात्मक अलगीकऱणात आहेत.

पुरुष रुग्णांचे सर्वाधिक बळी

राज्यातील कोरोनाच्या रुग्णांनी दोन लाखांचा आकडा पार केला आहे. या आकडेवारीचा विचार करता, राज्यातील एकूण रूग्णसंख्येपैकी 62 टक्के रूग्ण हे पुरुष असून 38 टक्के महिला रूग्ण आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या आकडेवारीनुसार ७ जुलैपर्यंत राज्यात २ लाख ३० हजार ५९९ रूग्ण कोरोनाबाधित झाले असून यातील १ लाख ३० हजार १०४ रूग्ण हे पुरुष आहेत. तर ८१ हजार ४१ महिला रूग्ण आहेत. तर, मृतांमध्ये ६५ टक्के पुरुष असून ३५ टक्के महिलांचा समावेश आहे. या माहितीवरून पुरुष कोरोनाचे सर्वाधिक बळी ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे.

मुंबईत ८९ हजार १२४ रुग्ण, ६० हजार १९५ रुग्ण कोविडमुक्त

मुंबईत गुरुवारी १ हजार २६८ रुग्ण, तर ६८ मृत्यूंची नोंद झाली. शहर उपनगरात कोरोना बाधितांची संख्या ८९ हजार १२४ झाली आहे. तर बळींचा आकडा ५ हजार १३२ झाला आहे. अन्य कारणांमुळे आतापर्यंत १२ मृत्यू झाले आहेत. मुंबईत एकूण ६० हजार १९५ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत. विविध रुग्णालयांत २३ हजार ७८५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

अन्य महत्वाच्या बातम्या...

मोठी बातमी! ICSE बोर्डाचे 10 वी, 12वीचे निकाल उद्या जाहीर होणार

कोरोनामुळे अमेरिकेत हाहाकार; दर आठवड्याला 13 लाख कामगारांवर बेरोजगारीचे संकट

भाजपच्या नरेंद्र मेहतांची नागरिकास अश्लिल, अर्वाच्च शिवीगाळ; हेल्पलाईनवर केलेली तक्रार

परीक्षा नाही, केवळ एक मुलाखत अन् सरकारी नोकरी; 43000 रुपये पगार

भारताने फोडले, अमेरिकेने घेरले! घाबरलेला चीन रशियाला शरण गेला, गयावया करू लागला

सप्टेंबर काय, नोव्हेंबरपर्यंत विद्यापीठांच्या परीक्षा होणे अशक्य; उदय सामंत यांचे युजीसीवर स्पष्टीकरण

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Challenge before Maharashtra! 6875 new #COVID19 positive cases, 219 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.