कोरोनामुळे अमेरिकेत हाहाकार; दर आठवड्याला 13 लाख कामगारांवर बेरोजगारीचे संकट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 07:49 PM2020-07-09T19:49:19+5:302020-07-09T19:50:31+5:30

अमेरिकेमध्ये मार्चच्या मध्यावर कोरोनाने उत्पात माजवायला सुरुवात केली होती. तेव्हा अमेरिकेत लॉकडाऊन जाहीर केले होते. तेव्हापासून सुरुवातीला हा बेरोजगारांचा आकडा दहा लाखांच्या आसपास होता.

Unemployment crisis in America; coronaVirus hits 1.3 million workers jobs lost | कोरोनामुळे अमेरिकेत हाहाकार; दर आठवड्याला 13 लाख कामगारांवर बेरोजगारीचे संकट

कोरोनामुळे अमेरिकेत हाहाकार; दर आठवड्याला 13 लाख कामगारांवर बेरोजगारीचे संकट

googlenewsNext

कोरोनामुळे जगभरात बेरोजगारीचा भस्मासूर आवासून उभा राहिला आहे. अमेरिकेत गेल्या आठवडाभरात तब्बल 1.3 दशलक्ष लोकांनी पहिल्यांदाच बेरोजगार म्हणून नोंदणी केली आहे. अमेरिकेच्या कामगार विभागाने ही चिंतेत टाकणारी आकडेवारी जाहीर केली आहे. त्या आधी या आकड्यामध्ये काहीशी घट झाली होती. 


अमेरिकेमध्ये मार्चच्या मध्यावर कोरोनाने उत्पात माजवायला सुरुवात केली होती. तेव्हा अमेरिकेत लॉकडाऊन जाहीर केले होते. तेव्हापासून सुरुवातीला हा बेरोजगारांचा आकडा दहा लाखांच्या आसपास होता. गेल्या 4 आठवड्यामध्ये सरासरी 1.4 दशलक्ष लोक बेरोजगार होत होते. याची नोंद ते सरकारकडे करत होते. या व्यतिरिक्त आणखी 1 दशलक्ष लोकांना कोरोनाच्या महामारीमध्ये कामगार, स्वयंरोजगार आणि कंत्राटे देऊन मदत करमण्यात आली आहे. ही मदत बेरोजगारांना अर्थसहाय्य या योजनेतून केली आहे. ही आकडेवारी एकत्र केल्यास गेल्या तीन आठवड्यांमध्ये हा आकडा जूनच्या मध्यावर असताना 2.24 वरून 2.44 वर गेला आहे. 


जुलैच्या पहिल्या काही दिवसांमध्ये अमेरिकेला कोरोना व्हायरसचा मोठा फटका जाणवू लागला आहे. रुग्ण वाढू लागल्याने देशभरात कडक नियम लागू केल्याने काही कामगारांना पुन्हा नोकरी गमवावी लागली आहे. यामुळे हे कामगार पुन्हा बेरोजगारी विम्याच्या रांगेत दुसऱ्यांदा दिसू लागले आहेत. 
वाईट परिस्थिती म्हणजे आधीचे दावेच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहेत की ते अर्थव्यवस्थेवरील संकट वाढत असल्याचे दर्शवत आहेत, असे अपवर्कचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ अ‍ॅडम ओझिमेक यांनी सांगितले. आठवड्यांच्या बेरोजगारीच्या दाव्यांपेक्षा स्वतंत्र दाव्यांचा दर हा दोन महिन्यांपेक्षा खाली गेला आहे.

जूनमध्ये हा दर ११.१ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. कारण अत्यावश्यक सेवा, अन्नपुरवठा आणि अन्य काही महत्वाच्या कंपन्यांनी त्यांच्या कामगारांना पुन्हा कामावर बोलावले होते. यामुळे अद्याप नुकसानीचा आकडा समजू शकलेला नाहीय. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

भाजपच्या नरेंद्र मेहतांची नागरिकास अश्लिल, अर्वाच्च शिवीगाळ; हेल्पलाईनवर केलेली तक्रार

परीक्षा नाही, केवळ एक मुलाखत अन् सरकारी नोकरी; 43000 रुपये पगार

भारताने फोडले, अमेरिकेने घेरले! घाबरलेला चीन रशियाला शरण गेला, गयावया करू लागला

सप्टेंबर काय, नोव्हेंबरपर्यंत विद्यापीठांच्या परीक्षा होणे अशक्य; उदय सामंत यांचे युजीसीवर स्पष्टीकरण

सैन्याचा हाय अलर्ट! Facebook, Truecaller, Instagram तातडीने डिलीट करा; जवानांना आदेश

शिवभोजन थाळी पुढचे तीन महिने 5 रुपयांनाच; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय

ही तर कोरोनाची पहिली लाट, जगाला मोठी किंमत मोजावी लागणार; चीनची धमकी

Web Title: Unemployment crisis in America; coronaVirus hits 1.3 million workers jobs lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.