university exams impossible to take place until November; Uday Samant's explanation on UGC | सप्टेंबर काय, नोव्हेंबरपर्यंत विद्यापीठांच्या परीक्षा होणे अशक्य; उदय सामंत यांचे युजीसीवर स्पष्टीकरण

सप्टेंबर काय, नोव्हेंबरपर्यंत विद्यापीठांच्या परीक्षा होणे अशक्य; उदय सामंत यांचे युजीसीवर स्पष्टीकरण

मुंबई : विद्यापीठाच्या अंतिम वर्षासह अन्य परिक्षांबाबत काय निर्णय घ्यायचा हे कुलगुरू सांगतील यावर मंत्रिमंडळ बैठकीत ठरविण्यात आले होते. राज्यातील 13 कुलगुरुंशी बोलल्यानंतर त्यांच्या सल्ल्याने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. यासाठी 17 मे रोजी युजीसीला पत्र लिहून अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची विनंती केली होती. आता सप्टेंबर नाही तर नोव्हेंबरपर्यंत राज्यात परीक्षा होऊ शकणार नाहीत, असे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. 


महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती पाहता आणि गावी गेलेले विद्यार्थी तसेच प्रश्नपत्रिका कोम हाताळणार असे अनेक प्रश्न पाहून कुलगुरुंनीच ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत परीक्षा घेणे शक्य नसल्याचे आम्हाला सांगितले आहे. यामुळे यूजीसीसोबत रहावे की कुलगुरू यांच्यासोबत जावे, याबाबत आम्हीच संभ्रमात सापडलो आहोत. कोरोना संकट मानवनिर्मित नाही, यामुळे विद्यार्थ्यांना वेठीस का धरावे, असा प्रश्नही सामंत यांनी उपस्थित केला आहे. 

कंटेन्मेंट झोनमधील विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घ्यायची, जे विद्यार्थी गावी गेले आहेत, त्यांची परीक्षा कशी घ्यायची, या उत्तरपत्रिका कोण हाताळणार, असे अनेक प्रश्न आहेत. एटीकेटीबाबत सर्व 13 कुलगुरूंशी चर्चा करून निर्णय घेण्याची भूमिका घेतली होती. १८ जूनला आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची बैठक झाली, यावेळी व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. याबाबत विनंती करणारे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना लिहिले होते, असेही सामंत म्हणाले.


 एटीकेटी विद्यार्थ्यांना सरासरी गुणानुसार पास करावे, अशी 13 कुलगुरुंची शिफारस होती. तो पास होत नसल्यास त्याला कोव्हिडच्या परिस्थितीमुळे ग्रेस गुण पद्धत अवलंबावी आणि त्याची एटीकेटी सोडवावी हा देखील मार्ग काढण्यात आला होता. तसेच सरासरी गुण दिल्याने टक्के कमी मिळाले अशा विद्यार्थ्यांसाठी कोरोना गेल्यानंतर परीक्षेची पुन्हा संधी देण्याचा निर्णय झाला होता, अशी माहिती सामंत यांनी दिली. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

सैन्याचा हाय अलर्ट! Facebook, Truecaller, Instagram तातडीने डिलीट करा; जवानांना आदेश

शिवभोजन थाळी पुढचे तीन महिने 5 रुपयांनाच; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय

ही तर कोरोनाची पहिली लाट, जगाला मोठी किंमत मोजावी लागणार; चीनची धमकी

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: university exams impossible to take place until November; Uday Samant's explanation on UGC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.