Delete Facebook, Truecaller and 89 apps immediately; Army asks to the soldiers | सैन्याचा हाय अलर्ट! Facebook, Truecaller, Instagram तातडीने डिलीट करा; जवानांना आदेश

सैन्याचा हाय अलर्ट! Facebook, Truecaller, Instagram तातडीने डिलीट करा; जवानांना आदेश

नवी दिल्ली : गलवान खोऱ्यातील हल्ल्यानंतर भारताने चीनच्या 69 अ‍ॅपवर बंदी आणली आहे. यामध्ये टिकटॉक, युसी ब्राऊझरही आहेत. आता सैन्यदलाने Facebook, TikTok, Truecaller आणि Instagram सह 89 अ‍ॅप तातडीने डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत. 


चिनी अ‍ॅप ही भारतीयांची माहिती चोरत असल्याचा आरोप करण्यात येत होते. अखेर चीनसोबतच्या वादामुळे ही अ‍ॅप भारतात बॅन करण्यात आली आहेत. आता भारतीय सैन्यदलाने चीनविरोधात मदत करणाऱ्या अमेरिकेच्या अ‍ॅपविरोधात मोहिम उघडली आहे. यामध्ये अमेरिकेचे फेसबुक, इन्स्टाग्रामसारखी अ‍ॅप आहेत. अशा 89 अॅपवर भारतीय सैन्यदलाने माहिती चोरत असल्याचा आक्षेप घेतला असून ही अ‍ॅप जवानांनी आपल्या मोबाईलमधून तातडीने डिलीट करण्याचे आदेश दिले आहेत. 


यामध्ये वुईचॅट, हाईकसारखी मेसेंजर अ‍ॅप आहेत. तर पब्जीसारखे गेमिंग अ‍ॅपही आहेत. डेटिंग अ‍ॅपमध्ये टिंडर, ओकेक्युपीड आदी अ‍ॅप आहेत. तसेच डेली हंट हे न्यूज अ‍ॅपही डिलीट करण्यास सांगितले आहे, असे लष्कराच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने सांगितले आहे. 


जाणून घ्या पूर्ण यादी....

अन्य महत्वाच्या बातम्या...

Breaking: प्रवीण दरेकर यांच्या वाहनाला अपघात; पोलीस व्हॅनची धडक

मुंबईकडून मोठा दिलासा! कोरोना रुग्ण दुपटीचा दर ४५ दिवसांवर

राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढू लागला; मुंबईतील मृतांचा आकडा 5000 पार

शिवभोजन थाळी पुढचे तीन महिने 5 रुपयांनाच; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय

ही तर कोरोनाची पहिली लाट, जगाला मोठी किंमत मोजावी लागणार; चीनची धमकी

पारनेरच्या पाच नगरसेवकांना अजित पवारांनी अखेर मिलिंद नार्वेकरांकडे सोपविले

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Delete Facebook, Truecaller and 89 apps immediately; Army asks to the soldiers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.