Maharashtra 6,603 new COVID-19 cases, 198 deaths today; mumbai crosses 5000 death mark | राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढू लागला; मुंबईतील मृतांचा आकडा 5000 पार

राज्यात पुन्हा कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढू लागला; मुंबईतील मृतांचा आकडा 5000 पार

मुंबई : राज्यात बुधवारी ६ हजार ६०३ रुग्णांची नोंद करण्यात आली, तर १९८ मृत्यू झाले आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या २ लाख २३ हजार ७२४ झाली आहे. याखेरीज, मृतांचा आकडा ९ हजार ४४८ झाला आहे. दिवसभरात ४ हजार ६३४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण १ लाख २३ हजार १९२ रुग्ण कोविडमुक्त झाले आहेत.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.०६ टक्क्यांवर पोहोचले असून मृत्यूदर ४.२२ टक्के झाला आहे. राज्यात बुधवारी नोंद झालेल्या १९८ मृत्यूंमध्ये मुंबईत ६२, ठाणे २८, नवी मुंबई ८, पालघर ३, रायगड ३, पनवेल मनपा ३, नाशिक मनपा ५, अहमदनगर १, जळगाव ८, जळगाव मनपा २, पुणे ४, पुणे मनपा २७, पिंपरी चिंचवड मनपा ५, कोल्हापूर ३, सांगली मिरज कुपवाड मनपा २, औरंगाबाद ३, औरंगाबाद मनपा ५, जालना ३, बीड १, नांदेड २, अकोला मनपा २, यवतमाळ १ आणि नागपूर मनपा १ या रुग्णांचा समावेश आहे.

मुंबईत १ हजार ३४७ रुग्ण तर ६२ मृत्यू झाले आहे. शहर उपनगरात कोरोना बाधितांची संख्या ८७ हजार ८५६ असून मृत्यू ५ हजार ६४ झाले आहेत. आतापर्यंत ५९ हजार २३८ कोविडमुक्त झाले आहेत. सध्या २३ हजार ५४३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ११ लाख ९१ हजार ५४९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८.७७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६ लाख ३८ हजार ७६२ व्यक्ती घरगुती अलगीकरणात आहेत. तर ४७ हजार ७२ व्यक्ती संस्थात्मक अलगीकऱणात आहेत.

ठाण्यात रुग्णांची संख्या वाढतीच

ठाणे जिल्ह्यात सध्या ५२ हजार ७३३ कोरोना बाधित आहेत. तर १ हजार ४१७ मृत्यू झाले आहेत. मुंबईच्या तुलनेत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या सात हजाराने अधिक आहेत. मुंबईत २३ हजार ५४३ रुग्ण उपचार घेत आहेत, तर ठाण्यात ३० हजार ६३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ठाण्यात २१ हजार २५२ रुग्ण कोरोना (कोविड)मुक्त झाले आहेत.

एकूण रुग्णसंख्येत १३ हजारांहून अधिक प्रौढ रुग्णांचा समावेश

राज्याच्या एकूण रुग्णसंख्येने दोन लाख रुग्णांचा टप्पा ओलांडला आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या अहवालानुसार ,कोरोना बाधितांच्या संख्येत ११ ते २० वयोगटातील १३ हजार ९९० प्रौढ रुग्ण आहेत. या रुग्णांचे प्रमाण ६.६३ टक्के आहे. तर शून्य ते १० वयोगटातील साडे सात हजारांहून अधिक रुग्ण आहेत. एकूण रुग्णसंख्येत या रुग्णांचे प्रमाण ३.६६ टक्के आहे.

अन्य महत्वाच्या बातम्या...

शिवभोजन थाळी पुढचे तीन महिने 5 रुपयांनाच; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नऊ महत्त्वाचे निर्णय

ही तर कोरोनाची पहिली लाट, जगाला मोठी किंमत मोजावी लागणार; चीनची धमकी

पारनेरच्या पाच नगरसेवकांना अजित पवारांनी अखेर मिलिंद नार्वेकरांकडे सोपविले

1962चे युद्ध हरल्यानंतर नेहरू, यशवंतराव देखील सीमेवर गेले होते; शरद पवारांकडून मोदींची स्तुती

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Maharashtra 6,603 new COVID-19 cases, 198 deaths today; mumbai crosses 5000 death mark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.