1962चे युद्ध हरल्यानंतर नेहरू, यशवंतराव देखील सीमेवर गेले होते; शरद पवारांकडून मोदींची स्तुती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 10:15 PM2020-07-07T22:15:12+5:302020-07-07T22:29:09+5:30

पुढील 100 वर्षांचा विचार करत राज्य सरकारने व्यापाऱ्यांसाठी पुण्याजवळ काही हजार एकर जागा उपलब्ध करुन द्यावी. तिथे उद्योग-व्यवसायाबरोबरच एक्झिबिशन सेंटर, गृहप्रकल्प उभारता येतील, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली असल्याचे पवार म्हणाले.

Nehru, Yashwantrao had also gone to LAC after losing the 1962 war; Sharad Pawar | 1962चे युद्ध हरल्यानंतर नेहरू, यशवंतराव देखील सीमेवर गेले होते; शरद पवारांकडून मोदींची स्तुती

1962चे युद्ध हरल्यानंतर नेहरू, यशवंतराव देखील सीमेवर गेले होते; शरद पवारांकडून मोदींची स्तुती

googlenewsNext

पुणे : गलवान खोऱ्यामध्ये चीनसोबत झालेल्या हिंसक झटापटीनंतर 18 दिवसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी लेहमध्ये सैन्याचे मनोबल वाढविण्यासाठी गेले होते. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 1962 च्या युद्धानंतरचा प्रसंग सांगितला आहे. 


1962 मध्ये जेव्हा चीनसोबतचे युद्ध भारत हरला होता, तेव्हा एलएसीवरील भारतीय जवानांचे मनोबल वाढविण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण हे गेले होते. याचप्रमाणे सध्याचे पंतप्रधान गेले. सीमेवर जेव्हा अशाप्रकारची परिस्थिती ओढवते तेव्हा देशाच्या नेतृत्वाने सैन्याचे मनोबल वाढविण्यासाठी जाणे गरजेचे असते, असे पवार यांनी सांगितले. पुण्यामध्ये पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. 


लॉकडाऊनचा सर्व व्यापाऱ्यांवर परिणाम झाला आहे.यामुळे मार्केटचं विकेंद्रीकरण करण्याचा विचार व्यापाऱ्यांचा आहे. तसेच पुण्याजवळच्या भागात व्यापार स्थलांतरित करण्याची व्यापाऱ्यांची मागणी असल्याचे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. तसेच मातोश्रीवर जाण्यात कमीपणा कसला असा प्रश्नही त्यांनी भाजपच्या टीकेवर उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामावर समाधानी असल्याचे स्पष्ट केले. पारनेरमध्ये नगरसेवक फोडल्याचा मुद्दा छोटा आहे. मातोश्रीवर जाण्यात कमीपणा कसला, कोरोनाच्या संकटाने तिजोरीवर आघात केला आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.

 
पुढील 100 वर्षांचा विचार करत राज्य सरकारने व्यापाऱ्यांसाठी पुण्याजवळ काही हजार एकर जागा उपलब्ध करुन द्यावी. तिथे उद्योग-व्यवसायाबरोबरच एक्झिबिशन सेंटर, गृहप्रकल्प उभारता येतील, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली असल्याचे पवार म्हणाले. पुण्याच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने व्यापाऱ्यांची मागणी महत्त्वाची असल्याचेही पवार म्हणाले. 

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

मुंबई सावरली! आज दिवसभरात केवळ ७८५ नवे रुग्ण सापडले

एकाच दिवशी भाजपच्या तीन आमदारांना कोरोना; दोन पुण्यातील

मातोश्रीवर जाण्यात कमीपणा कसला? शरद पवारांनी दिले भाजपला उत्तर

CBSE चा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा; नववी, बारावीचा अभ्यासक्रम कमी केला

चीनला भिडले, माघार घ्यायला भाग पाडले अन् मगच भारतीय जवान मागे आले!

एक दोन नाही! 11 अमेरिकी लढाऊ विमानांनी चोहोबाजुंनी घेरले; चिनी सैन्य पाहतच राहिले

वनप्लसचा सर्वात स्वस्त फोन भारतात कधी येणार? लाँचिंगची तारीख Amazon नेच केली लीक

मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची मोठी सुवर्णसंधी; पगार 1.22 लाखापर्यंत

Web Title: Nehru, Yashwantrao had also gone to LAC after losing the 1962 war; Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.