शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

महायुतीत तणाव! भाजपा अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बिनसलं; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 13:08 IST

पुण्यात अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवल्यानंतर भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. 

पुणे - जुन्नर येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा होणार असून या सभेपूर्वी महायुतीतील तणाव सगळ्यांसमोर आला. सभेपूर्वी अजित पवारांच्या ताफ्याला भाजपा कार्यकर्त्यांकडूनच काळे झेंडे दाखवण्यात आले त्यामुळे याठिकाणी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. जुन्नरच्या पर्यटनावरून स्थानिक भाजपा नेत्या आशा बुचके यांनी अजितदादांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी केली. 

आशा बुचके म्हणाल्या की, आजपर्यंत महायुती अबाधित राहावी यासाठी आम्ही खूप सहन केले. नेत्यांचा निर्णय आम्हाला मान्य होता. मात्र आता आमच्या गळ्याशी आलेले आहे. जुन्नर तालुक्यातील पर्यटनाच्या बैठकांना आम्हाला डावलण्यात येते. फक्त अतुल बेनके यालाच पुढे केले जाते. महायुतीत किती घटक पक्ष आहेत त्यांना ठाऊक नाही का? जुन्नर तालुक्यात तुम्ही पर्यटनाच्या चोरून बैठका घेता आणि स्वत:ला पालकमंत्री म्हणवता तुम्हाला पालकमंत्री म्हणवण्याचा अधिकार नाही असा घणाघात त्यांनी केला. यावेळी भाजपा नेत्या आशा बुचके यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची संतप्त भूमिका

जुन्नरमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांकडून अजित पवारांना काळे झेंडे दाखवले त्यावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं संतप्त भूमिका घेतली आहे. हा आमच्या पक्षाचा कार्यक्रम आहे मग त्यांनी निदर्शने काढण्याची काही गरज नव्हती. माझ्याही मतदारसंघात जेव्हा भाजपाचे मंत्री येतात, पदाधिकारी येतात तेव्हा आम्ही असा आक्षेप घेत नाही. त्यामुळे महायुतीच्या एकतेला गालबोल लावण्याचं काम कुणी करत असेल तर त्यांना ताकीद देण्याचं काम वरिष्ठांकडून करावं. ही जनसन्मान यात्रा आहे. कुठल्याही गैरसमजातून असा प्रकार कुठल्याही घटक पक्षाने करू नये असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी म्हटलं आहे. 

दरम्यान, जुन्नरमध्ये नक्की काय झालं याबाबत अजित पवारांना माहिती असेल कारण अजितदादा पुण्याचे पालकमंत्री आहेत. ते उत्तर देतील. अजित पवार स्वत: बोलतील असं मंत्री छगन भुजबळांनी सांगितले. तर जनसन्मान यात्रा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम आहे. काळे झेंडे दाखवणाऱ्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा  आणि आज जे काळे झेंडे दाखवले गेले त्याबाबत देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ खुलासा करावा अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.  

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसPuneपुणेBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसsunil tatkareसुनील तटकरेMahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४