शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

युतीमध्ये तणाव; १२ मे रोजी घटक पक्षांची बैठक

By admin | Updated: May 6, 2015 04:08 IST

केंद्रातील भाजपा सरकारला एक वर्ष तर राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारला सहा महिने पूर्ण होत असले तरी सत्ताधारी भाजपाने महायुतीतील घटक पक्षांना चार हात लांबच ठेवले आहे.

मुंबई : केंद्रातील भाजपा सरकारला एक वर्ष तर राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारला सहा महिने पूर्ण होत असले तरी सत्ताधारी भाजपाने महायुतीतील घटक पक्षांना चार हात लांबच ठेवले आहे. त्यामुळे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रासपा व शिवसंग्राम या महायुतीतील घटक पक्षांमध्ये नाराजी धुमसत आहे. पुढील राजकीय दिशा ठरवण्याकरिता मंगळवार, १२ मे रोजी मुंबईतील एमआयजी क्लबमध्ये सकाळी साडेअकरा वाजता घटक पक्षांची बैठक होणार आहे.रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी ही बैठक बोलावली असून त्याला राजू शेट्टी, महादेव जानकर, विनायक मेटे हे उपस्थित राहणार आहेत. राज्यात सरकार येण्यापूर्वी जेव्हा भाजपाने शिवसेनेबरोबरची युती तोडली, तेव्हा या घटक पक्षांनी भाजपासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी लेखी स्वरूपात या नेत्यांना काही आश्वासने दिली होती. बहुतांश आश्वासने पाळलेली नाहीत, असे या नेत्यांचे मत आहे. राजू शेट्टी म्हणाले, भाजपाची निवडणुकीपूर्वीची व नंतरची भाषा खूप बदलली आहे. अद्याप या सरकारचे शंभर अपराध भरलेले नाहीत. त्यामुळे आम्ही संयम राखलेला आहे. राज्यातील ऊस व दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता सरकारने काहीही केलेले नाही, असा आक्षेप शेट्टी यांनी घेतला. विनायक मेटे यांनी सांगितले की, घटक पक्षांना समन्वय समितीमध्ये स्थान देण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते. मात्र अद्याप त्याबाबत निर्णय घेतलेला नाही. महामंडळ व समित्यांच्या नियुक्त्या झालेल्या नाहीत. त्यामुळे आठवले यांनी बोलावलेल्या बैठकीला आम्ही हजर राहू. हा केवळ दबावतंत्राचा भाग नाही, अशी पुस्ती त्यांनी जोडली. (विशेष प्रतिनिधी)घटक पक्षांच्या नाराजीची प्रमुख कारणे> रिपाइंचे अविनाश महातेकर स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत यांना विधान परिषदेवर नियुक्ती नाही.> मराठा आरक्षण रद्द झाल्याने विनायक मेटे नाराज> धनगर आरक्षणाच्या पूर्ततेअभावी रासपाचे महादेव जानकर चिडले.> समन्वय समितीत घटक पक्षांना स्थान दिले नाही.> सरकारमध्ये घटक पक्षांच्या नेत्यांची कामे होत नाहीत.> घटक पक्षांच्या नेत्यांना सन्मान दिला जात नाही.