शिक्षकाकडून विद्यार्थिनीला पळविण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: December 5, 2014 03:47 IST2014-12-05T03:46:59+5:302014-12-05T03:47:40+5:30

भाची कोदाड बाजूला गेल्याचे मुलीच्या मामाने पाहिले होते. त्यामुळे मामाने पाठलाग केला. परंतु ती आढळली नाही. (वार्ताहर)

The teacher tried to flee the student | शिक्षकाकडून विद्यार्थिनीला पळविण्याचा प्रयत्न

शिक्षकाकडून विद्यार्थिनीला पळविण्याचा प्रयत्न

तलासरी : आपल्याच शाळेत ८ वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीला पळविण्याचा प्रयत्न शिक्षकानेच केल्याचा निंदनीय प्रकार तलासरी तालुक्यातील उधवा येथे घडला. याबाबत तलासरी पोलिसांत गुन्हा नोंद होऊन आरोपीस अटक केली आहे.
डहाणू तालुक्यातील मोडगाव पाटीलपाडा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये इयत्ता ८ वीत शिकणारी १४ वर्षीय विद्यार्थिनी मामाकडे जाण्यासाठी उधवा येथे स्टँडवर मंगळवारी संध्याकाळी उभी होती. यावेळी शिक्षक शिवाजी माणिक मुंडे (२८) हा मोटरसायकलवरून उधवा स्टँड येथे आला. अंधार पडला आहे, मी तुला घरी सोडतो असे सांगून मोटारसायकलवर बसविले व उधवा मार्गे कोदाड बाजूकडे नेऊ लागला, परंतु इच्छितस्थळी शिक्षक आपल्याला सोडत नसल्याचे पाहून मुलीने मोटारसायकल थांबवायला शिक्षकाला भाग पाडून सुटका करून घेतली. परंतु घाबरलेल्या या मुलीला रात्री कोठे जावे हे न समजल्याने तिने ती रात्र कोदाड येथील चर्चमध्ये काढली. भाची कोदाड बाजूला गेल्याचे मुलीच्या मामाने पाहिले होते. त्यामुळे मामाने पाठलाग केला. परंतु ती आढळली नाही. (वार्ताहर)

Web Title: The teacher tried to flee the student