शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

मद्यधुंद तरुणीने उडवली टॅक्सी

By admin | Updated: June 10, 2015 03:33 IST

दक्षिण मुंबईतल्या हॉटेलमध्ये पार्टी झोडून दारूच्या नशेत तर्रर्र झालेल्या जान्हवी गडकर या वकील तरुणीने इस्टर्न फ्री-वेवर वाशीनाका येथे स्वत:च्या आॅडी कारने एका टॅक्सीला समोरून जोरदार धडक दिली.

मुंबई : दक्षिण मुंबईतल्या हॉटेलमध्ये पार्टी झोडून दारूच्या नशेत तर्रर्र झालेल्या जान्हवी गडकर (३२) या वकील तरुणीने इस्टर्न फ्री-वेवर (पूर्व मुक्त मार्ग) वाशीनाका येथे स्वत:च्या आॅडी कारने एका टॅक्सीला समोरून जोरदार धडक दिली. हा अपघात सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडला. धक्कादायक बाब म्हणजे जान्हवी इतकी नशेत होती, की चेंबूरला जाण्यासाठी ती आॅरेंज गेटकडे उतरणाऱ्या फ्री-वेच्या विरुद्ध मार्गिकेवर घुसली. या विरुद्ध मार्गिकेवरून सुमारे १० कि.मी. अंतर तिने वेगात कापले.अपघात इतका भीषण होता, की मारुती ओमनी टॅक्सी अर्ध्यावर चेपली गेली. त्यामुळे टॅक्सीचालक आणि पुढल्या सीटवर बसलेला प्रवासी अशा दोघांचा जागेवरच मृत्यू झाला; तर मागे असलेल्या तीन महिला व तरुण गंभीर जखमी झाले. टॅक्सीचालक वगळता उर्वरित पाच प्रवासी एकाच कुटुंबातील होते. जखमींवर चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एअर बॅगमुळे ती वाचलीया भीषण अपघातात आरोपी जान्हवीच्या शरीरावर एकही ओरखडा उठलेला नाही. एअर बॅग्जमुळे ती वाचली.मृत : हुसेन अब्दुल सय्यद (५७, टॅक्सीचालक), सलीम साबूवाला (५०). जखमी : सलीम यांच्या पत्नी हफिजा (४५), साबीया (२२), सलमा (१९), मुलगा नोमान (१७)