मुख्यमंत्र्यांनी दिले टार्गेट

By Admin | Updated: May 12, 2015 02:21 IST2015-05-12T02:21:20+5:302015-05-12T02:21:20+5:30

राज्यात येत्या पाच वर्षांत पूर्ण करावयाचे विकास कामांचे लक्ष्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख विभागांना दिले आहेत. निर्धारित लक्ष्यांच्या अंमलबजावणीवर

Targeted by Chief Minister | मुख्यमंत्र्यांनी दिले टार्गेट

मुख्यमंत्र्यांनी दिले टार्गेट

यदु जोशी, मुंबई
राज्यात येत्या पाच वर्षांत पूर्ण करावयाचे विकास कामांचे लक्ष्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रमुख विभागांना दिले आहेत. निर्धारित लक्ष्यांच्या अंमलबजावणीवर देखरेखीसाठी मुख्यमंत्री कार्यालयात स्वतंत्र यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी सर्व विभागांच्या सचिवांना पत्र पाठविले आहे.भाजपा आणि शिवसेनेने निवडणुकीच्या प्रचारात दिलेली आश्वासने, मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी विकासासंदर्भात केलेल्या घोषण आणि सहकारी मंत्र्यांनी केलेल्या सूचनांचा समावेश या ‘लक्ष्या’मध्ये करण्यात आला आहे. परवडतील अशी ११ लाख घरे मुंबई महानगर क्षेत्रात उभारणे, ग्रामीण भागात अडीच लाख तर आदिवासी भागातही तेवढीच घरे उभारणे, झोपडपट्टयांचा पुनर्विकास निविदा मागवून करणे, बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचे काम येत्या १२ महिन्यांत सुरु करण्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

Web Title: Targeted by Chief Minister