शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

पुणे विभागातील अकरा लाख नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 12:26 PM

पुणे विभागातील कोल्हापूर वगळता उर्वरीत जिल्ह्यात टँकर सुरु आहेत...

ठळक मुद्देसाडेचार लाख पशूधन बाधित : जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदरमधे टॅँकर सुरुच

पुणे : पश्चिम महाराष्ट्रत जोरदार पाऊस बरसूनही पुणे, सातारा, सांगलीसह सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ११ लाख २८ हजार ७६५ नागरिकांना ८८६ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. विभागातील ५०१ गावे आणि ३,१४७ वाड्या व ४ लाख ६० हजार ९८८ पशूधनाला पाणी टंचाईची झळ बसली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर व आंबेगाव तालुक्यातील १ लाख ९७८ लोकसंख्येला ५० टँकरने पाणी पुरविले जात असल्याची माहिती विभागीय आयुक्तालयाच्या वतीने देण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर झालेल्या जोरदार पावसामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातही पूरस्थिती निर्माण झाली होती. लाखो नागरिकांचे स्थलांतर करावे लागले. सोलापूर जिल्ह्यात पाऊस कमी झाला असला तरी जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेले उजनी धरणात ११७.४७ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा झाला. धरण पूर्णक्षमतेने भरल्यानंतर मोठ्या प्रमाणावर पाणी सोडून दिल्याने पंढरपूरसह काही तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. पुणे विभागातील कोल्हापूर वगळता उर्वरीत जिल्ह्यात टँकर सुरु आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूरमधे पावसाची सरासरी कमी आहे. बारामती व इंदापूर तालुक्यातील २९ गावे-वाड्या बाधित असून, तब्बल ६५ हजार नागरिक बाधित आहेत. सातारा जिल्ह्यातील माण व खटाव या कायम दुष्काळी भागातील गावांमधे देखील टँकर सुरु आहेत. त्यातही माण तालुक्यातील ७१ गावे व ५६७ वाड्या वस्त्यांवर ९७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येथील सव्वालाखाहून अधिक लोकसंख्या व ६५ हजार ५३९ पशूनधन बाधित आहे. सोलापूर जिल्ह्यातील तीनशे एक गावे व दीड हजारांहून अधिक वाड्यांमधे ३४६ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येथील ६ लाख ९८ हजार ९४९ नागरिक आणि ३ लाख ६० हजार ४३६ पशूधन बाधित झाले आहे. पूरग्रस्त सांगली जिल्ह्यातील ७८ गावे व ६०३ वाड्यांवर ९० टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु आहे. पावणेदोन लाख नागरिकांना टँकरद्वारे पाणी देण्यात येत असून, २७ हजार ५४३ पशूधन बाधित झाले आहे.  --टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणाºया गावांची संख्या तालुकानिहाय       पुणे जिल्हा             टँकर संख्या    गावे-वाड्या    बाधित लोकसंख्याआंबेगाव                      १          १/७           ८३१बारामती                     १५        १५/१४५        ३३,०४०दौंड               ९        ७/५०        १५,५४१इंदापूर               १४        १२/५८        ३२,८१९पुरंदर              ११        ५/६४        १८,७५६एकूण              ५०        ४०/३२४        १,००,९७८-----सातारा        माण            ९७        ७१/५६७        १,३५,०४२खटाव                   ३        ८/३९        ४,९११फलटण                   २        ३/१८        ३,९८८एकूण            १०२        ८२/६२४        १,४३,९४१----सोलापूर                 ३४६        ३०१/१५९६    ६,९८,९४९सांगली                 ९०        ७८/६०३        १,८४,८८८

टॅग्स :Puneपुणेwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूकRainपाऊसdroughtदुष्काळ