शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक व्यवस्थेत ‘तामिळनाडू पॅटर्न’; कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 12:37 IST

मतदान पथकातील कर्मचारी, अधिकारी यांना मध्यवर्ती वितरण केंद्रावर आदल्या दिवशी पहाटेच पोहोचावे लागते आणि मतदानानंतरही साहित्य जमा करण्यासाठी जावे लागते, ही सगळी ससेहोलपट थांबविणारा तामिळनाडू राज्याने राबविलेला पॅटर्न आता महाराष्ट्रात लागू करण्यात आला आहे.

यदु जोशीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: मतदान पथकातील कर्मचारी, अधिकारी यांना मध्यवर्ती वितरण केंद्रावर आदल्या दिवशी पहाटेच पोहोचावे लागते आणि मतदानानंतरही साहित्य जमा करण्यासाठी जावे लागते, ही सगळी ससेहोलपट थांबविणारा तामिळनाडू राज्याने राबविलेला पॅटर्न आता महाराष्ट्रात लागू करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी बारामती आणि राहुरी मतदारसंघांत आज पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. यामुळे मतदान प्रक्रियेतील हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळला आहे.

मतदान केंद्रावर वापरायचे साहित्य मध्यवर्ती वितरण केंद्रावरून ताब्यात घेण्यासाठी तसेच मतदान संपल्यानंतर हे साहित्य केंद्रावर जमा करण्यासाठी मतदान पथकातील केंद्राध्यक्ष व सर्व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहवे लागत असे. आता केवळ क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी साहित्य ताब्यात घेऊन ते संबंधित मतदान केंद्रावर थेट पोहोचवायचे आहे. बाकी कर्मचारी, अधिकारी हे थेट प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर जातील. मतदान झाल्यानंतर क्षेत्रिय अधिकारी हे मतदान केंद्राध्यक्ष व पुरेसे सुरक्षा कर्मचारी/वर्ग ड कर्मचारी वगळता, अन्य कर्मचाऱ्यांनी वितरण केंद्रावर जाण्याची गरज नसेल. केंद्राध्यक्ष व क्षेत्रिय अधिकारी हे साहित्य नेऊन जमा करतील.

संजय यादव यांची कल्पना

मुंबईत सुरू करण्यात आलेला ‘कलरकोड’चा प्रयोग तामिळनाडूने स्वीकारला असून, याच निवडणुकीत त्याचा अंमल करण्यात आला आहे. सध्या राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक असलेले संजय यादव हे मुंबईचे जिल्हाधिकारी असताना त्यांनी ‘कलर कोडिंग’चा हा प्रयोग राबविला होता. मतदाराच्या हाती मतदानासाठीची जी चिठ्ठी दिली जाते तिलाच रंगीत चिठ्ठी जोडून द्यायची आणि त्याच रंगाच्या कार्पेटवरून चालत त्याने बूथवर पोहोचायचे, छतालाही अशाच रंगीत पट्टया असतील, असा हा उपक्रम होता. 

१२ अधिकाऱ्यांचे पथक करत आहे अभ्यास

तामिळनाडू पॅटर्नचा अभ्यास करण्यासाठी मुंबईतील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने राज्यातील प्रत्येक विभागातील दोन अशा १२ अधिकाऱ्यांना सध्या तामिळनाडूत पाठविण्यात आले आहे. 

तामिळनाडू पॅटर्नमुळे मतदान प्रक्रियेत असलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना मध्यवर्ती वितरण केंद्रावर मतदानाच्या आदल्या दिवशी वा मतदानानंतर  जाण्याची गरज नाही. थेट मतदान केंद्रावर जाता येईल. एस. चोक्कलिंगम, राज्य मुख्य निवडणूक अधिकारी

English
हिंदी सारांश
Web Title : Tamil Nadu election pattern offers relief to Maharashtra polling staff.

Web Summary : Maharashtra adopts the 'Tamil Nadu pattern' easing poll workers' burden. Staff now go directly to polling stations, skipping central distribution centers. Only designated officials handle materials, streamlining the process and offering significant relief.
टॅग्स :Electionनिवडणूक 2026BaramatiबारामतीRahuriराहुरी