शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदार मॅडम हिरॉइनसारख्या दिसतात, बबनराव लोणीकरांची जीभ घसरली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 10:48 IST

भाजपाचे ज्येष्ठ नेते बबनराव लोणीकर यांनी शेतकरी मोर्चासाठी मार्गदर्शन करताना केले विधान

ठळक मुद्देभाजपाचे नेते बबनराव लोणीकर महिला तहसीलदारांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यातशेतकरी मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी वेळ पडला तर हिरॉइन आणू आणि हिरॉइन न मिळाल्यास आपल्या तहसीलदार मॅडम आहेतचलोणीकर यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

जालना - माजी मंत्री आणि भाजपाचे नेते बबनराव लोणीकरमहिला तहसीलदारांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. शेतकरी मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी वेळ पडला तर हिरॉइन आणू आणि हिरॉइन न मिळाल्यास आपल्या तहसीलदार मॅडम आहेतच, असे विधान लोणीकर यांनी केले. दरम्यान, लोणीकर यांनी केलेल्या या वक्तव्याविरोधात संताप व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांना 25 हजार रुपये अनुदान मिळावे यासाठी परतूरमध्ये शेतकरी मोर्चा काढण्यासाठी बबनराव लोणीकर मार्गदर्शन करत होते. त्यावेळी ते म्हणाले की, '' शेतकऱ्यांना 25 हजार रुपये अनुदान हवे असेल, तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा मोर्चा मराठवाड्यातील परतूनहून निघाला पाहिजे. त्यासाठी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांना कार्यकर्ते जमवून आणले पाहिजेत. तुम्ही मला मोर्चासाठी देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत दादा, सुधीरभाऊ यांना घेऊन येण्यास सांगा, मी आणतो. प्रसंगी गर्दी जमवण्यासाठी एखाद्या हिरॉइन बोलावू, हिरॉइन नाही मिळाती तर आपल्या तहसीलदार मॅडम आहेतच.'' यासंदर्भातील ऑडिओ क्लीप एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दाखवली आहे. दरम्यान, बबनराव लोणीकर यांनी केलेल्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच लोणीकर यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी केली आहे. तसेच भाजपानेही त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.  

टॅग्स :Babanrao Looneykarबबनराव लोणीकरBJPभाजपाWomenमहिलाJalanaजालना