शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात स्वाइन फ्लूचे १५६ बळी; सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 05:15 IST

राज्यात उन्हाच्या पाऱ्याने चाळिशीचा टप्पा गाठला असून स्वाइन फ्लूनेही कहर केला आहे. १ जानेवारी ते १४ मेदरम्यान राज्यभरात जवळपास १५६ रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला असून बाधित रुग्णांची संख्या १ हजार ५३६ एवढी आहे.

मुंबई : राज्यात उन्हाच्या पाऱ्याने चाळिशीचा टप्पा गाठला असून स्वाइन फ्लूनेही कहर केला आहे. १ जानेवारी ते १४ मेदरम्यान राज्यभरात जवळपास १५६ रुग्णांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला असून बाधित रुग्णांची संख्या १ हजार ५३६ एवढी आहे. तर पुणे मनपा क्षेत्रातील पाच रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. याखेरीज, सध्या राज्यभरात १६७ रुग्णांवर रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत.
राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात नाशिक, नागपूर, अहमदनगर, पुणे मनपा आणि कोल्हापूरमध्ये सर्वाधिक बळी गेले आहेत. १ जानेवारी ते १४ मेदरम्यान १० लाख ५८ हजार ३४१ रुग्णांना तपासण्यात आले आहे. तर १८ हजार ७८८ संशयित फ्लू रुग्णांना आॅसेलटॅमिवीरच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे, या काळात १ हजार २०७ रुग्णांना रुग्णालयांत उपचार करून घरी सोडण्यात आले आहेत. २०१८ साली राज्यात स्वाइन फ्लूमुळे ४६१ रुग्णांचा बळी गेला होता, तर २ हजार ५९३ रुग्ण आढळून आले होते, तर २०१७ मध्ये ७७८ मृत्यूंची नोंद झाली होती आणि ६ हजार १४४ बाधित रुग्णांची संख्या दिसून आली होती.
आरोग्य विभागाच्या वतीने स्वाइन फ्लूच्या प्रतिबंध आणि नियंत्रणासाठी राज्यातील फ्लू सदृश्य रुग्णांचे नियमित सर्वेक्षण करण्यात येत आहे. याशिवाय विनाविलंब उपचार, विलगीकरण कक्ष, प्रतिबंधक लसीकरण, साथरोग प्रतिबंध व नियंत्रक समितीची स्थापना करणे अशा विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.



राजस्थानात सर्वाधिक मृत्यू
राज्यासह देशातही स्वाइनची दहशत असून राजस्थानमध्ये स्वाइन फ्लूमुळे सर्वाधिक म्हणजे २०१ जणांचा मृत्यू झाला असून ४ हजार ९९९ इतके बाधित रुग्ण असल्याची नोंद आहे. राजस्थानच्या खालोखाल गुजरातमध्येही स्वाइनची दहशत कायम आहे. गुजरातमध्ये १५० रुग्णांचा बळी गेला असून ४ हजार ७६५ स्वाइनचे रुग्ण आढळले आहेत.

टॅग्स :Swine Flueस्वाईन फ्लूMaharashtraमहाराष्ट्र