शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेसाठी शेतक-यांचा ‘स्वाभिमान’ गहाण!

By admin | Updated: November 4, 2014 02:43 IST

वर्षभरात खतासह शेतीस लागणा-या सर्वच घटकांचे दर वाढले असताना ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेने गेल्यावर्षीपेक्षा तब्बल तीनशे रुपयांनी उचल कमी मागितली.

राजाराम लोंढे, कोल्हापूर वर्षभरात खतासह शेतीस लागणा-या सर्वच घटकांचे दर वाढले असताना ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेने गेल्यावर्षीपेक्षा तब्बल तीनशे रुपयांनी उचल कमी मागितली. ‘स्वाभिमानी’च्या १३ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच गेल्यावर्षीपेक्षा उचल कमी मागून संघटनेने शेतकऱ्यांचे की सरकारचे हित पाहिले याविषयी उलट-सुलट चर्चा सुरू आहे. गेल्यावर्षी संघटनेने तीन हजारांची मागणी करत २६५० रुपयांवर तडजोड केली. गेल्यावर्षी एवढाच यंदा साखरेचा दर आहे, पण शेतीशी निगडित सर्व बाबींचे दर वाढल्याने यंदा किमान ३५०० रुपयांची मागणी होऊन किमान २८०० रुपयांपर्यंत राजू शेट्टी तडजोड करतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची होती. पण २७०० रुपयांची मागणी करून शेट्टी यांनी शेतकऱ्यांना धक्काच दिला.साखरेचे मूल्यांकन प्रतिक्विंटल २६३० रुपये राज्य बँकेने जाहीर केले आहे. त्यातून कारखानदारांच्या हातात शेतकऱ्यांना देण्यासाठी सरासरी १८०० रुपये उपलब्ध होऊ शकतात. हे गृहीत धरून मागणी केली म्हटले तरी गेल्यावर्षीपेक्षा ५० रुपये उचल कमी आहे तरीही ३ हजारांची मागणी करणे अपेक्षित होते. केंद्रात व राज्यात बदलेले सरकार व त्यामध्ये ‘स्वाभिमानी’चा सहभागामुळे शेट्टींचे गणित चुकल्याचे बोलले जात आहे. त्यात संघटनेत पडलेली फुटीमुळे रस्त्यावरील आंदोलन यशस्वी होईल का, याविषयीही संघटनेच्या नेत्यांना साशंकता असल्यानेच तब्बल २५ दिवसांची डेडलाईन देऊन रस्त्यावरील संघर्ष टाळण्याचा प्रयत्न शेट्टी यांनी केला आहे. या संघटनेला आता रस्त्यावरची लढाई झेपणार नसल्यानेच त्या संघर्षापेक्षा कायद्यावरच बोट ठेवून कारखानदारांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला, पण यात संघटनेचीच कोंडी होणार हे निश्चित आहे.सरकारमध्ये ‘स्वाभिमानी’ सहभागी असली तरी त्यांचा एकही आमदार निवडून आलेला नाही. त्यामुळे संघटना भाजपावर जास्त दबाव टाकू शकत नाही. त्यात शेट्टी आपल्यासह सदाभाऊ खोत यांना मंत्रिपद घेणार आहेत. राजकीय तडजोडीमुळे चळवळीच्या उद्देशाला कुठे तरी धक्का लागल्याची भावना शेतकऱ्यांमधून बोलली जात आहे. कारखानदारांना एफआरपी द्यायची म्हटली तर दोन टप्प्यातच देता येऊ शकते. संघटनेने कायद्याचा आधार घेऊन गुन्हे दाखल करण्यास सुरू केले तर साखर कारखानदार अडचणीत येणार म्हणूनच शेतकरी संघटनेने कारखाने सुरू करण्यास सांगूनही कारखानदार अजून गप्पच दिसत आहेत.संघटनेने १५ किलोमीटरचे हवाई अंतरानुसार वाहतूक घेण्यास सांगितले आहे. हे खासगी कारखान्यांसाठी ठीक आहे, पण सहकारी कारखान्यांचे कार्यक्षेत्र ५० किलोमीटरपर्यंत येते. मग त्या बाहेरील सभासदांचे काय करायचे? शेतकऱ्यांनी कारखान्यांच्या गेटवर ऊस पोहोचवला तरच एफआरपी एकरकमी देण्याचे बंधन कारखानदारांवर आहे. पण सहकारात कायदा आणि सहकार्याचा समन्वय साधावा लागत असल्याची भावना कारखानदारांमधून व्यक्त होत आहेत.