शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

पुणे स्फोटात नक्षलींचा हात असल्याचा संशय

By admin | Updated: September 11, 2014 03:20 IST

महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) हाती लागलेल्या काही धाग्यादोऱ्यांच्या आधारे पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याबाहेर १० जुलै रोजी झालेल्या बाँबस्फोटात नक्षलवाद्यांचा हात असल्याची शक्यता

डिप्पी वांकाणी, मुंबईमहाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) हाती लागलेल्या काही धाग्यादोऱ्यांच्या आधारे पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्याबाहेर १० जुलै रोजी झालेल्या बाँबस्फोटात नक्षलवाद्यांचा हात असल्याची शक्यता पडताळून पाहिली जात आहे. एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले, की ज्याप्रकारे हा स्फोट घडवण्यात आला त्यावरून संशयाची सुई नक्षलवाद्यांकडेही वळते. ज्यांनी स्फोट घडवला त्यांना जर मोठ्या प्रमाणात घातपात घडवायचा असता आणि सामान्य नागरिकांचा जीव घ्यायचा असता तर त्यांनी एखाद्या मोक्याच्या आणि गर्दीच्या ठिकाणी बाँब पेरला असता. मात्र नक्षलवाद्यांनी आजवर सामान्य नागरिकांना सहसा लक्ष्य बनवलेले नाही. ते शक्यतो सुरक्षा दलांतील कर्मचाऱ्यांना आपले लक्ष्य बनवतात. पोलीस ठाण्याच्या बाहेर, पोलिसांसाठी राखीव पार्किंगमध्ये बाँब बसवलेली दुचाकी लावणे हे पोलिसांना लक्ष्य बनवण्याच्या नक्षलवाद्यांच्या मानसिकतेचे द्योतक आहे. स्फोटात वापरलेली दुचाकी सातारा न्यायालयाच्या आवारातून चोरली होती आणि तिची नंबरप्लेटही बदललेली नव्हती. बाँब बनवण्यासाठी पोटॅशियम आणि अमोनियम नायट्रेटसारख्या स्फोटकांचा वापर करण्याची पद्धतही नक्षलवाद्यांच्या कृत्यांशी सुसंगत आहे. गेल्या काही वर्षांत अनेक नक्षल कार्यकर्त्यांना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. पोलिसांना संशय आहे, की त्याचा बदला घेण्यासाठी हा स्फोट घडवला गेला असावा.