शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणाच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टाची स्थगिती

By admin | Updated: November 14, 2014 12:32 IST

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आघाडी सरकारने घेतलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी स्थगिती दिली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १४ - विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आघाडी सरकारने घेतलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी स्थगिती दिली आहे. मुसलमानांना पाच टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयातही हायकोर्टाने फेरबदल केले आहेत. 

आघाडी सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला १६ तर मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. याविरोधात मुंबई हायकोर्टात ३ वेगवेगळ्या याचिका दाखल झाल्या होत्या. हायकोर्टात शुक्रवारी या तिन्ही याचिकांवर एकत्रित सुनाणी झाली. हायकोर्टाने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली. याशिवाय मुस्लिम समाजासाठी सरकारी नोकरीत ५ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयालाही हायकोर्टाने स्थगिती दिली. मात्र शिक्षणामध्ये मुसलमानांना पाच टक्के आरक्षण देता येईल, पण खासगी शिक्षण संस्थांना हा निर्णय बंधनकारक राहणार नाबी असे हायकोर्टाने नमूद केले. 

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आणि मराठा आरक्षणासाठी आग्रही असलेले विनायक मेटे यांनी या निर्णयाची हाती आल्यावरच आम्ही पुढील रणनिती ठरवू अशी प्रतिक्रिया दिली. 

काय म्हटले आहे हायकोर्टाने ? 

> आघाडी सरकारने मतपेटीवर लक्ष ठेऊन मराठा समाजाला १६ टक्के तर मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. सध्या राज्यात एकूण ५२ टक्के आरक्षण लागू असून मराठा व मुस्लिम समाजाचे आरक्षण त्यामध्ये जोडल्यास राज्यातील आरक्षणाचे प्रमाण थेट ७३ टक्क्यांपर्यंत जात होते. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार राज्यात अपवादात्मक स्थिती वगळता ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिले जात नाही. मुंबई हायकोर्टाने याच निर्णयाचा दाखला देत दाखल्याचा आधार देत आरक्षण देण्यास नकार दिला. 

> मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागासलेला नसल्याने त्यांन आरक्षणाची गरज नाही. राणे समितीने दिलेले आरक्षण घटनाबाह्य असल्याचे हायकोर्टाने सांगितले.