शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

निलंबित तहसीलदार पुन्हा रुजू

By admin | Updated: June 17, 2015 03:54 IST

रेशनच्या धान्याचा काळाबाजार केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आलेल्या नाशिक जिल्ह्णातील सात तहसीलदारांच्या निलंबनास

मुंबई : रेशनच्या धान्याचा काळाबाजार केल्याचा ठपका ठेवत निलंबित करण्यात आलेल्या नाशिक जिल्ह्णातील सात तहसीलदारांच्या निलंबनास महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) मंगळवारी अंतरिम स्थगिती देत या सर्वांना येत्या सात दिवसांत पुन्हा पूर्वीच्याच पदांवर रुजू करून घ्यावे, असा आदेश दिला.या सात तहसीलदारांनी निलंबनाच्या विरोधात केलेल्या स्वतंत्र याचिकांवर ‘मॅट’चे न्यायिक सदस्य आर. बी. मल्लिक यांनी हे आदेश दिले. याचिकांवर ३ जुलै रोजी अंतिम सुनावणी होणार आहे.याआधी १ जून रोजी तातडीने झालेल्या प्राथमिक सुनावणीनंतर न्यायाधिकरणाने पुढील सुनावणी होईपर्यंत या सातही जणांच्या पदांवर अन्य कोणाचीही नेमणूक न करण्याचा तात्पुरता आदेश दिला होता. ‘मॅट’च्या आजच्या आदेशाने ज्या निलंबित तहसीलदारांना दिलासा मिळाला आहे त्यांत गणेश राठोड (नाशिक), मनोज खैरनार(सिन्नर), कैलास कडगल(पेठ), महेंद्र पवार (इगतपूरी), संदीप आहेर (निफाड), नरेशकुमार बहिरम (त्र्यंबकेश्वर) आणि मंदार कुलकर्णी (दिंडोरी) यांचा समावेश आहे.गेल्या सुनावणीनंतर सरकारने याचिकाकर्त्यांच्या निलंबनाचे समर्थन करणारे प्रतिज्ञापत्र व संबंधित फाइल सादर केली. मात्र त्यावरून निलंबनासाठी सबळ आधार दिसत नाही, असे सकृद्दर्शनी मत व्यक्त करत ‘मॅट’ने निलंबनास स्थगिती दिली. याआधी याचिकाकर्ते थेट ‘मॅट’ कडे येऊ शकत नाहीत, हा सरकारने घेतलला आक्षेप न्यायाधिकरणाने अमान्य केला होता.मुळात आम्ही कधीही सुरगाणा येथे काम केलेले नाही. आमच्या कार्यक्षेत्रातील अन्न पुरवठा गोदामांमध्ये कोणताही काळाबाजार झाला नसल्याचे स्वत: नाशिक जिल्हाधिकारी यांनी शासनाला लेखी कळवले आहे. असे असतानाही केवळ विधानपरिषदेत अन्न पुरवठा मंत्र्यांनी निलंबनाची कारवाई जाहिर केल्यामुळे आम्हाला निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई करण्याआधी आम्हाला बाजू मांडण्याची संधी शासनाने दिलेली नाही, असा दावा ही या सात तहसीलदारांनी आपल्या याचिकांमध्ये केला आहे.या सुनावणीत याचिकाकर्त्या तससीलदारांतर्फे अ‍ॅड. दिनेश बी, खैरे तर सरकारतर्फे सरकारी वकील एम. के. राजपुरोहित काम पाहात आहेत. (प्रतिनिधी)