सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना लागली आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2023 13:55 IST2023-01-15T13:46:53+5:302023-01-15T13:55:17+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करताना दिव्यामुळे सुप्रिया सुळेंची साडी पेटली.

Supriya Sule's saree caught fire while garlanding the statue of Shivaji Maharaj | सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना लागली आग

सुप्रिया सुळे यांच्या साडीने घेतला पेट; छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना लागली आग


पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासोबत एक मोठा अनर्थ होता होता टळला. पुण्यातील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करताना सुप्रिया सुळे यांच्या साडीला अचानक आग लागली. सुदैवानं ही आग मोठी नव्हती आणि तात्काळ विझविण्यात आली.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग लागल्याची समोर आली आहे. पुण्यातील हिंजवडी भागामध्ये एका कराटे कोचिंग क्लासच्या उद्घाटनासाठी सुप्रिया सुळे यांना बोलावण्यात आलं होतं. यावेळी टेबलावर ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करताना तिथं ठेवलेल्या दिव्यानं सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग लागली. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यात त्यांच्या साडीच्या पदराला आग लागल्याचं दिसत आहे. सुदैवाने यात सुप्रिया सुळे यांना कुठलीही हानी झाली नाही आणि तात्काळ आग विझविण्यात आली.
 

Web Title: Supriya Sule's saree caught fire while garlanding the statue of Shivaji Maharaj