शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
8
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
9
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
10
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
11
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
12
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
13
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
14
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

कोरोना लसीकरणाबाबत सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, केली मोठी मागणी

By बाळकृष्ण परब | Published: January 19, 2021 7:02 PM

corona vaccination Update : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्र लिहून अभिनंदन केले आहे. तसेच या पत्राच्या माध्यमातून कोरोना लसीकरणाबाबत एक महत्त्वाची मागणी केली आहे.

ठळक मुद्देकोरोनाकाळात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्याच्या आरोग्य यंत्रणेने अतिशय उल्लेखनीय काम करून देशासमोर आदर्श निर्माण केलाकोरोना लसीकरणामध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात यावेमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईमधून कोरोनाविरोधातील लसीकरण अभियानाला औपचारिक सुरुवात झाली होती

मुंबई - राज्यात कोरोनाविरोधातील लसीकरणाला शनिवारपासून सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईमधून कोरोनाविरोधातील लसीकरण अभियानाला औपचारिक सुरुवात झाली होती. दरम्यान, राज्यातील कोरोनाकाळातील परिस्थिती कुशलपणे हाताळल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पत्र लिहून अभिनंदन केले आहे. तसेच या पत्राच्या माध्यमातून कोरोना लसीकरणाबाबत एक महत्त्वाची मागणी केली आहे.मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात सुप्रिया सुळे म्हणतात की, कोरोना विषाणूने धुमाकूळ घातल्याने देशाच्या आणि राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर ताण आला होता. अशा परिस्थितीत तुमच्या नेतृत्वाखाली राज्याच्या आरोग्य यंत्रणेने अतिशय उल्लेखनीय काम करून देशासमोर आदर्श निर्माण केला आहे. त्यासाठी तुमचे, मंत्रिमंडळाचे अभिनंदन.

दरम्यान, या पत्रामधून सुप्रिया सुळे यांनी कोरोना लसीकरणामध्ये दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आता कोरोनावरील लस उपलब्ध झाली आहे. त्यामुळे तुम्हाला नम्र विनंती आहे की, लशीकरणाला सुरुवात करताना ती गरजू घटकांपर्यंत पोहोचावी, यासाठी दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरीकांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्याबाबत सकारात्मक विचार करावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारCorona vaccineकोरोनाची लस