शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सुपरची प्रदूषण मंडळाकडून पाहणी

By admin | Updated: January 14, 2015 00:46 IST

सार्वजनिक आरोग्य जपणे व पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी जैव वैद्यकीय कचरा (बायो-मेडिकल वेस्ट) हाताळणीची कठोर नियमावली असताना मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील

मेडिकल प्रशासनाकडून चौकशीचे आदेशनागपूर : सार्वजनिक आरोग्य जपणे व पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी जैव वैद्यकीय कचरा (बायो-मेडिकल वेस्ट) हाताळणीची कठोर नियमावली असताना मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील जैव कचरा भंगारात विकण्याच्या उद्देशाने तो साठवून ठेवण्यात आल्याचे वास्तव ‘लोकमत’ने सोमवारी प्रसिद्ध करताच खळबळ उडाली. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने याची पाहणी करून त्याचा अहवाल पाठविण्याचे तर मेडिकल प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.मेयो, मेडिकल व सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील रुग्णाच्या संपर्कात आणि उपचार करताना वापरलेल्या विशेषत: आयव्ही बॉटल्स, इंजेक्शन्स, सिरींज, रबळी नळ्या, ग्लोव्हज, औषधांचे रिकामे डबे आदी बायो मेडिकल वेस्टला भंगार व्यावसायिकांकडून चांगली किंमत मिळते. पैशाच्या हव्यासापायी काही कर्मचारी या वस्तू गोळा करून नंतर त्या भंगारात विकतात. या संदर्भातील वृत्त लोकमतने १३ जानेवारीच्या अंकात ‘सुपरच्या आत बायो मेडिकल वेस्टचा ढीग’ या मथळ्याखाली प्रसिद्ध केले. याची दखल महाराष्ट्र प्रदूषण मंडळ-१ ने घेतली. या मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी हेमा देशपांडे यांनी सुपरला भेट देऊन छाती रोग वॉर्डाच्या बाजूलाच असलेला जैव कचऱ्याचा ढीग पाहून आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी सुपरच्या संबंधित अधिकाऱ्यांना या घातक कचऱ्याची तत्काळ विल्हेवाट लावण्याच्या सूचना दिल्या. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विशेष कार्य अधिकारी म्हणून नुकतेच पदभार सांभाळलेले डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनीही याची गंभीर दखल घेतली. त्यांनी या संदर्भातील चौकशीचे आदेश दिले आहेत. वृत्तामुळे आज अनेक भंगार व्यावसायिकांनी बायो मेडिकल वेस्ट लपवून ठेवला होता, तर काहींनी आपली दुकाने बंद ठेवल्याचे दिसून आले. (प्रतिनिधी)