शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी सोडून समाजसेवा करणारा 'बुद्धू'!

By admin | Updated: September 21, 2015 14:27 IST

बुद्धू शब्द ऐकताच डोळ्यासमोर येते 'ढ' व्यक्ती. मात्र सिंदखडेराजा येथील बुद्धू आहे अपघातग्रस्तांचा देवदूत...

राजेश शेगोकार , बुलडाणा

बुद्धू.. हा शब्द ऐकताच समोर येतो एकदम 'ढ', ज्याला काही समजत नाही अशी व्यक्ती. पण सिंदखेडराजा याला अपवाद आहे. या गावात 'बुद्धू' असं कुणी म्हटलंच, तर समोर येतो अपघातग्रस्तांचा देवदूत! नोकरी सोडून रुग्णसेवेचा, समाजसेवेचा छंद जोपासणारा हा युवक आहे 'बुद्धू चौधरी.' राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६वर बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा हे ऐतिहासिक स्थळ आहे. या मार्गावर पुणे, औरंगाबाद, नागपूर, अमरावती अकोलासारख्या मोठय़ा शहरांमध्ये जाणार्‍या वाहनांची मोठी वर्दळ असते. परिसरात कुठेही अपघात झाला, तर घटनास्थळी सर्वांत आधी पोहोचतो बुद्धू चौधरी. जखमींना तत्काळमदत देण्यासाठी त्याची धावपळ सुरू होते. बुद्धूचे हे काम तो आठव्या वर्गात होता, तेव्हापासून सुरू आहे. तो शाळेत असताना चिंचेच्या झाडावरून एक विद्यार्थी खाली पडला. त्याच्याभोवती बघ्यांची गर्दी झाली; पण कुणीही हात लावायला तयार नव्हतं. तेव्हा आठव्या वर्गातील बुद्धूने त्या मुलाला उचलून थेट दवाखाना गाठला. दुर्दैवाने तो मुलगा दगावला; मात्र अपघातग्रस्तांना लोक मदत करत नाहीत, हे त्याच्या मनामध्ये कुठेतरी ठासून बसले. तेव्हापासून अपघात झाला की, तिथे बुद्धू धावत सुटतो. नावाने जरी बुद्धू असला, तरी हाच बुद्धू अपघातग्रस्तांचा जीवनदाता ठरला आहे. विज्ञान शाखेचा पदवीधर असलेला बुद्घू मेहकर येथे एका संस्थेत नोकरीला लागला; मात्रअवघ्या सहा महिन्यांत त्याने नोकरी सोडली. आता घरची शेती आणि समाजकार्य हेच त्याचे ध्येय झाले आहे.. अन् अपघातग्रस्तांकडून व्यक्त होणारी कृतज्ञतेची भावना हीच बुद्धूची कमाई.  'लोकजागर' परिवाराच्या माध्यमातून त्याची सुरू असलेली ही समाजसेवा परिसरासाठी कौतुकाचा अन् आदराचा विषय बनला आहे.

मनोरुग्णांसाठीही धडपड सिंदखेडराजा परिसरात भीक मागून पोट भरणारे अनेक मनोरुग्ण आहेत. या मनोरुग्णांच्या खाण्यापिण्यापासून आरोग्यापर्यंतची काळजी बुद्धू घेतो. त्यांना आंघोळ घालणे, त्यांच्यावर उपचार करणे यासाठी बुद्धूची धडपड असते. 'बुद्धू' कुठलेही बक्षीस घेत नाही. कुणालाही काम सांगत नाही. प्रथमोपचारच नव्हेतर; जखमेला टाके घालण्यापर्यंत सर्व काम तो करतो. बुद्धूचं काम एवढय़ा लोकांपर्यंत पोहोचलं आहे, की अपघात झाल्याबरोबर पोलिसांसोबतच रुग्णालयातूनही बुद्धूूला सूचना दिली जाते. सूचना मिळाल्यावर बुद्धू असेल तेथून त्वरित धाव घेतो.