शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

येळगाव धरणात विवाहितेची मुलीसह आत्महत्या

By admin | Updated: April 2, 2015 01:57 IST

बुलडाणा जिल्ह्यातील घटना; एका मुलीला वाचविण्यात यश.

बुलडाणा : दोन मुलींसह धरणात उडी मारणार्‍या मातेचा एका मुलीसह बुडून करुण अंत झाल्याची घटना येळगाव धरण परिसरात बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेने तीन वर्षीय चिमुरडीचे प्राण वाचले आहे. मृतक महिलेचे नाव सरला मोरे (३0 वर्ष) असून, ती शहर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या चांडक ले-आऊट येथील रहिवासी व पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अतुल मोरे यांची पत्नी आहे. मोरे नेहमीप्रमाणे कामावर जात असताना सरला तिने आज शिवण क्लासला जाते, म्हणून त्यांना सांगितले होते. दरम्यान, सरला हिने स्मृती (वय ६) व श्रावस्ती (वय ३) या दोघींना सोबत घेतले. शिवण क्लासला न जाता तिने मुलींसह थेट येळगाव धरण गाठले. यावेळी येळगाव धरण परिसरात कमी गर्दी होती. काही व्यक्तींनी त्यांच्याकडे धरण परिसरात फिरायला आले म्हणून लक्ष दिले नाही. दरम्यान, येळगाव धरणावरील सुरक्षा रक्षक राहुल देवीदास बाजारे यांनी सरला हिला दोन्ही मुलींसह धरणाच्या काठावर पाहिले होते; मात्र थोड्या वेळानंतर धरण काठावर कोणीच दिसले नाही, म्हणून शंका आल्याने बाजारे यांनी धरण काठाकडे धाव घेतली. यावेळी धरणात काही अंतरावर सरला मोरे बुडताना दिसली, तिच्या पाठीवर स्मृती हिला रूमालाने बांधले होते. लहान मुलगी श्रावस्ती काठाच्या दिशेने बुडत होती. बाजारे यांनी त्वरित धरणात उडी घेऊन बुडणार्‍या श्रावस्तीला काठावर आणले. तोपर्यंत सरला व स्मृती पाण्यात बुडाल्या होत्या. घटना लक्षात येताच काही लोकांनी धरण काठावर धाव घेतली; परंतु ते दोन्ही मायलेकींचे प्राण वाचवू शकले नाहीत. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार तांदळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. शवविच्छेदनासाठी मायलेकींचे मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.