शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

रेल्वेच्या ‘रेल नीर’ ब्रँडप्रमाणेच एसटीचे ‘नाथ जल’ लवकरच 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2019 7:00 AM

रेल्वेच्या ‘रेल नीर’प्रमाणे एसटीकडूनही आपला स्वतंत्र ब्रँड आणला जाणार आहे. त्याला ‘नाथ जल’ असे नाव देण्यात आले आहे.

ठळक मुद्दे रेल्वेप्रमाणेच एसटी बसस्थानकांमध्ये खासगी कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्या विक्रीसाठी उपलब्धसंत एकनाथ यांच्या नावातील ‘नाथ’ हा शब्द घेऊन ‘नाथ जल’ असे नाव

राजानंद मोरे - पुणे : रेल्वेच्या ‘रेल नीर’ या बाटलीबंद पाण्याच्या ब्रँडप्रमाणेच आता एसटी महामंडळाचे ‘नाथ-जल’ लवकरच प्रवाशांना मिळणार आहे. वारकरी संप्रदायाचा बहुमान ठेवण्याच्या उद्देशाने ‘नाथ जल’ असे या ब्रँडचे नामकरण करण्यात आले आहे. राज्यभरातील बसस्थानकांवर या ‘ ब्रँड ’ नावानेच बाटलीबंद पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. खासगी यंत्रणेमार्फत ही सेवा पुरविली जाणार असून लवकरच ही प्रक्रिया पुर्ण होण्याची शक्यता आहे.प्रवाशांना पिण्याचे शुध्द पाणी मिळावे, तसेच त्यांची आर्थिक लुट थांबावी या उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने काही वर्षांपुर्वी ‘रेल नीर’ या नावाने बाटलीबंद पाणी वितरण करण्यास सुरूवात केली. खासगी वितरकांच्या तुलनेत स्वस्त दरात शुध्द पाणी मिळत असल्याने ‘रेल नीर’ला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. सर्व रेल्वेस्थानकांवर हे पाणी उपलब्ध करून दिले जाते. तसेच रेल्वेगाड्यांमध्ये अधिकृत विक्रेत्यांकडेही हेच पाणी मिळते. काही खासगी कंपन्यांचे पाणी वितरण करण्यासाठी ठराविक मुदत देण्यात आली आहे. यापार्श्वभुमीवर एसटी महामंडळाने आपल्या प्रवाशांना शुध्द व स्वस्त दरात पाणी देण्यासाठी पावले टाकली आहेत. रेल्वेच्या ‘रेल नीर’प्रमाणे एसटीकडूनही आपला स्वतंत्र ब्रँड आणला जाणार आहे. त्याला ‘नाथ जल’ असे नाव देण्यात आले आहे. ‘एसटी’तील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संत एकनाथ यांच्या नावातील ‘नाथ’ हा शब्द घेऊन ‘नाथ जल’ असे नाव देण्यात आले आहे. वारकरी संप्रदायाचा बहुमान करण्यासाठी हे नाव निश्चित करण्यात आले.  

 दरम्यान, रेल्वेप्रमाणेच एसटी बसस्थानकांमध्ये सध्या विविध खासगी कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्या विक्रीसाठी उपलब्ध आहे. या बाटल्यांची विक्री चढ्यादराने होत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी असतात. एक लिटरची बाटली २० ते २५ रुपयांना दिली जाते. काही ठिकाणी थंड पाण्याची बाटली दिल्यास ‘कुलिंग’चे पैसे घेतले जातात. त्यामुळे प्रवाशांची आर्थिक लुट होते. अनेकदा स्थानिक ब्रँडच्या बाटल्याही चढ्या किंमतीने विकल्या जातात. यापार्श्वभुमीवर ‘एसटी’ने शुध्द व स्वस्त दरात बाटलीबंद पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. ------------

टॅग्स :Puneपुणेrailwayरेल्वेWaterपाणीGovernmentसरकारDiwakar Raoteदिवाकर रावते