शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाचा व्यापार थांबवा, दर्जा सुधारा

By admin | Updated: December 18, 2014 05:22 IST

एकीकडे खासगी शाळांचे पेव फुटले आहे. शिक्षण महागले आहे. सर्वांना समान संधी उपलब्ध होण्यासाठी शिक्षणाचा व्यापार थांबविण्याची मागणी

नागपूर : एकीकडे खासगी शाळांचे पेव फुटले आहे. शिक्षण महागले आहे. सर्वांना समान संधी उपलब्ध होण्यासाठी शिक्षणाचा व्यापार थांबविण्याची मागणी विधानसभेत दोन दिवसीय चर्चेदरम्यान सर्वपक्षीय सदस्यांनी केली. नियम २९३ अन्वये योगेश सागर यांनी हा प्रस्ताव सादर केला. सुनील प्रभू यांनी शिक्षण क्षेत्र भांडवलदारांचा अड्डा झाल्याचे सांगत त्यावर सरकारचे नियंत्रण असावे, अशी मागणी केली. डी.पी. सावंत यांनी आरटीईची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली. अ‍ॅड. पराग अळवणी यांनी दर्जेदार शिक्षण द्यायचे असेल तर एका वर्गात ३० ते ३५ विद्यार्थी असावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी प्रचलित शिक्षण पद्धत आमूलाग्र बदलण्याची, डॉ. शशिकांत खेडेकर यांनी सिंदखेडराजा येथे महिला विद्यापीठाची, राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुणवत्तेवर आधारित शिक्षणाची गरज व्यक्त केली. राजभाऊ वाजे यांनी शिक्षणसम्राट मोठे भूखंड घेऊन बसल्याचा आरोप केला. संजय केळकर व मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पाच ओळीत सांगितला जात असल्याबाबत नाराजी व्यक्त केली. अबू आझमी यांनी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मुलांना शासकीय शाळेत शिकण्याची सक्ती करण्याची मागणी केली. आसीफ शेख यांनी उर्दू शाळा उघडण्याची मागणी केली. माधुरी मिसाळ यांनी पहिली ते दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात बदल करण्याची मागणी केली. मेघा कुळकर्णी यांनी शालेय शिक्षणात कला, क्रीडा व संगीताला प्राधान्य देण्याची तर जितेंद्र आव्हाड यांनी कळवा येथे मंजूर कम्युनिटी कॉलेज तातडीने उभारण्याची मागणी केली. शिक्षक मतदार संघ रद्द करून अंगणवाडी सेविकांना प्रतिनिधित्व द्यावे, अशी मागणी प्रशांत बंब यांनी केली.