शहरं
Join us  
Trending Stories
1
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
2
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
5
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
6
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
7
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
8
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
9
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
10
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
11
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
12
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
13
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
14
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
15
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
16
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
17
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
18
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
19
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
20
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिभावंतांच्या पाठीशी राहू-मुख्यमंत्री

By admin | Updated: February 28, 2015 06:00 IST

मराठी भाषेला केवळ अभिजात दर्जा मिळून चालणार नाही, तर मराठीला व्यवहाराची भाषा बनवावे लागेल. मराठी साहित्याने माणूस आनंदी वा अंतर्मुख होतो;

नाशिक : मराठी भाषेला केवळ अभिजात दर्जा मिळून चालणार नाही, तर मराठीला व्यवहाराची भाषा बनवावे लागेल. मराठी साहित्याने माणूस आनंदी वा अंतर्मुख होतो; पण ही भाषा जगण्याला मदत करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. चीन, जपान या देशांनी आपल्या भाषांना जगण्याचे साधन बनविले. आधुनिक जगातील माहिती तंत्रज्ञान त्यांनी आपल्या भाषेत आणले. आपल्याला हे निर्माण करावे लागेल, असे प्रयत्न करणाऱ्या प्रतिभावंतांच्या पाठीशी शासन उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या मराठी साहित्यातील सर्वोच्च अशा ‘जनस्थान’ पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक अरुण साधू यांना ‘जनस्थान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एक लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सौ. अरुणा साधू, ग्रंथाली प्रकाशनाचे संस्थापक दिनकर गांगल, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, कार्यवाह लोकेश शेवडे व्यासपीठावर उपस्थित होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, इतिहासात डोकावल्यास दोन प्रकारच्या भाषा टिकल्याचे समोर येते. एक आक्रमणकर्त्यांची भाषा आणि दुसरी जगण्याची व्यवस्था निर्माण करणारी भाषा. मराठी भाषा कधी कोणावर आक्रमण करू शकत नाही; पण मराठीला व्यवहाराची भाषा बनवता येईल. आज गुगलवर एखादी माहिती इंग्रजीत चटकन मिळते; मराठीत तसे होत नाही. आपल्याला हे निर्माण करावे लागेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)