शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

'कंबरेखाली वार केल्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 06:22 IST

एकनाथ शिंदे यांची आणि माझी मैत्री पूर्वी लपूनछपून होती. मात्र, आज आम्ही उघडपणे मैत्री करीत आहोत.

ठाणे : एकनाथ शिंदे यांची आणि माझी मैत्री पूर्वी लपूनछपून होती. मात्र, आज आम्ही उघडपणे मैत्री करीत आहोत. विरोधी पक्षात असतानाही आम्ही कधीच परस्परांवर कंबरेखालचे वार केले नाहीत. परंतु, राजकारणात काही लोक तोंडावर गोड बोलतात, कौतुक करतात, आपले मित्र असल्याचे भासवतात. मात्र, प्रत्यक्षात ते कंबरेखाली वार करून मोकळे होतात. अशा लोकांमुळेच राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याची टीका गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर केली.

ठाणे महापालिकेच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण आणि ई-भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आव्हाड बोलत होते. ठाकरे यांच्यासोबत काम करताना कम्फर्टेबल वाटते. आतापर्यंत कोणत्याच मुख्यमंत्र्यांसोबत काम करताना इतके कम्फर्टेबल वाटले नसल्याची जाहीर कबुली आव्हाड यांनी दिली.

मातोश्रीवर एकदा गेलो होतो, तेव्हा ममता, माया व प्रेम काय असते, ते कळले होते, असेही ते म्हणाले. किसननगर भागात क्लस्टर योजना राबविली गेली आहे. परंतु, मुंब्य्रातदेखील अशा अनेक अनधिकृत, धोकादायक इमारती उभ्या आहेत. त्यामुळे येथेही ही योजना राबवावी, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. किंबहुना, एमएमआर रिजनमध्ये क्लस्टर योजना राबविल्यास त्यातून सर्वांनाच हक्काचे घर मिळेल, असे ते म्हणाले.

एसआरएच्या माध्यमातून ठाण्यात ३०० चौरस फुटांची घरे दिली जाणार आहेत. पोलीस आणि चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना म्हाडा किंवा तत्सम योजनांमध्ये १० टक्के राखीव कोटा ठेवला जाणार आहे. मुंबईच्या धर्तीवर ठाण्यातील एसआरएचे नियम समान केले जाणार आहेत. पारसिकनगर येथे २७ एकरचा भूखंड आहे. त्यावर दिवंगत अभिनेत्री नूतन यांचे घर आहे. तिथे पक्षी अभयारण्य, नवा प्रकल्प ठाणेकरांसाठी राबवावा, अशी मागणी त्यांनी केली. शिवाय, गावठाणे आणि कोळीवाड्यांतील रहिवाशांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

एमएमआर रिजनचे वेगळे प्राधिकरण करणार- शिंदे

मुंबईच्या धर्तीवर ठाण्यात एसआरएचा विकास करताना एमएमआर रिजनमध्ये क्लस्टरची योजना राबविली जाणार आहे. या शिवाय, एमएमआरए क्षेत्राचे वेगळे प्राधिकरण केले जाणार असल्याची माहिती नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमावेळी दिली.च्यानिमित्ताने या भागाचा विकास त्याच ठिकाणी होईल.

धोकादायक किंवा अनधिकृत इमारतींचा विकासही त्याच ठिकाणी होईल. ठाणे आणि शिवसेनेचे अतूट नाते आहे. ठाण्यात आमूलाग्र बदल झाला आहे. परंतु, ठाणेकरांचा २५ वर्षांपासून विश्वास कायम आहे, असे शिंदे म्हणाले. मुंबई महापालिका मोठी असली तरी ठाणे महापालिकेत अनेक मोठे प्रकल्प उभे राहिले आहेत, ही ठाणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. दुसरीकडे क्लस्टरच्या विकासात कोणताही दुजाभाव केला जाणार नसल्याचे शिंदे यांनी जितेंद्र आव्हाडांना उद्देशून स्पष्ट केले.

टॅग्स :maharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीJitendra Awhadजितेंद्र आव्हाडUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसthaneठाणे