शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

मोदी आणि शिवरायांची तुलना राज्यातल्या भाजपा नेत्यांना मान्य आहे का?; शिवसेनेचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2020 10:43 IST

आज के शिवाजी- नरेंद्र मोदी पुस्तकावरुन शिवसेनेचा पुन्हा एकदा हल्लाबोल

मुंबई: भाजपाच्या कार्यालयात प्रसिद्ध झालेलं 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' पुस्तक वादात सापडलं आहे. या प्रकरणी भाजपानं माफी मागावी आणि पुस्तक मागे घ्यावं, अशी मागणी होत आहे. वादग्रस्त पुस्तकावरुन काल भाजपाला धारेवर धरणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजही भाजपाला लक्ष्य केलं. छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना राज्यातल्या भाजपा नेत्यांना मान्य आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सर्व मुद्द्यांवर लगेच भूमिका मांडणारे भाजपा नेते शिवराय आणि मोदींच्या तुलनेवर संध्याकाळपर्यंत स्वत:ची भूमिका मांडतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. त्यांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही. मात्र भाजपाच्या कार्यालयात प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकात शिवरायांची तुलना मोदींशी करण्यात आलेली आहे. राज्यातल्या भाजपा नेत्यांना हे मान्य आहे का? असल्यास त्यांनी तसं स्पष्ट सांगावं, असं राऊत म्हणाले. भाजपानं लवकरात लवकर वादग्रस्त पुस्तक मागे घ्यावं आणि आमचा या पुस्तकाशी काहीही संबंध नाही, असं जाहीर करावं, असंदेखील राऊत यांनी म्हटलं. उद्धवजी, राऊतांच्या जिभेला लगाम घाला; संभाजीराजांचा संतप्त पवित्रा तर राऊतांनी दिलं प्रत्युत्तरदिल्लीतल्या भाजपा कार्यालयात रविवारी 'आज के शिवाजी- नरेंद्र मोदी' पुस्तक प्रकाशित होताच संजय राऊत यांनी ट्विटरवरुन भाजपाचा समाचार घेतला. शिवरायांच्या वंशजांनी याबद्दल भूमिका घ्यावी, असं आवाहनदेखील त्यांनी केलं होतं. त्यावरुन राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजीराजेंनी संताप व्यक्त केला. मी माझी भूमिका आधीच जाहीर केलेली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना लगाम घालावा, अशा शब्दांत संभाजीराजे यांनी त्यांचा संताप व्यक्त केला होता. 'आज के शिवाजी नरेंद्र मोदी' पुस्तकावरुन छत्रपती संभाजीराजे संतप्त; म्हणाले...संभाजीराजेंनी ट्विटरवरुन व्यक्त केलेल्या संतापावरदेखील संजय राऊत यांनी भाष्य केलं. 'शिवरायांचे सगळे वंशज सध्या भाजपात आहेत. त्यांचा आम्ही सन्मानच करतो. सातारा आणि कोल्हापूरच्या गादीबद्दल आम्हाला आदर आहे. आम्ही सर्वसामान्य असूनही शिवरायांच्या मान-सन्मानासाठी भूमिका घेत आहोत. तसंच आव्हान आम्ही शिवरायांच्या वंशजांना केलं तर त्यात चिडायचं कारण काय, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. छत्रपतींच्या वंशजांबद्दल मी काहीही चुकीचं बोललेलो नाही. याबद्दल मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशीदेखील बोललो आहे, असं राऊत यांनी सांगितलं. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजNarendra Modiनरेंद्र मोदी