अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 20:06 IST2025-10-13T20:00:10+5:302025-10-13T20:06:17+5:30
10th and 12th Exams Dates: विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावाची परीक्षांच्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन आठवडे आधीच सुरू होणार आहेत.

अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावाची परीक्षांच्या तारखा आज जाहीर झाल्या आहेत. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार यावर्षी दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन आठवडे आधीच सुरू होणार आहेत. त्यानुसार बारावीरीच परीक्षा ही १० फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होईल. तर दहावीची परीक्षा हा २० फेब्रुवारीपासून सुरू होईल.
आतापर्यंत बारावीची परीक्षा ही फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस तर दहावीची परीक्षा ही मार्च महिन्याच्या सुरुवातील सुरू होत असे. मात्र शिक्षण मंडळाने यावर्षी या परीक्षा दोन आठवडे आधीच घेण्याचं नियोजन केलं आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा ही १० फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. ही परीक्षा १८ मार्चपर्यंत चालेल. तर दहावीची परीक्षा ही २० फेब्रुवारीला सुरू होणार असून, ती १८ मार्च २०२६ पर्यंत चालेल.
तर बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी आणि तोंडी, अंतर्गत मूल्यमान आणि व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा तसेच माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा ह्या २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारी २०२६ या काळात होतील. तसेच दहावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी आणि तोंडी, अंतर्गत मूल्यमान आणि व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा आणि शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र आणि गृहशास्त्र या विषयांच्या प्रात्यक्षिक परीक्षा ह्या २ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२६ या काळात होतील.