शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

भावुक वातावरणात संघर्ष यात्रेचा प्रारंभ

By admin | Updated: August 28, 2014 23:42 IST

सिंदखेडराजा येथून पंकजा मुंडे यांच्या संघर्ष यात्रेस प्रारंभ.

बुलडाणा : राष्ट्रमाता जिजाऊंच्या सिंदखेडराजाविषयी मला खूप आकर्षण होते. माझे वडील मला लहानपणी म्हणायचे की, मी तुला सिंदखेडराजामधून आमदार करीन. योगायोगाने बुलडाणा जिल्ह्याचे सासर मिळाले. माझ्या वडिलांनी मला धनसंपत्तीचा वारसा न देता समाजासाठी संघर्ष करण्याचा वारसा दिला आहे. हा संघर्ष जनतेच्या कल्याणाचा असून, त्यांचे स्वप्न पूर्ण करणे हाच आपल्या जीवनाचा उद्देश आहे, अशा भावनिक शब्दांमध्ये पंकजा मुंडे-पालवे यांनी गुरुवारी संघर्ष यात्रेचा प्रारंभ केला.सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन करून आज ह्यपुन्हा संघर्षह्ण यात्रेचा प्रारंभ झाला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत पंकजा मुंडे यांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी सांगितल्याने सभा भावुक झाली. वडिलांच्या जाण्याचे दु:ख जितके मला आहे, तितकेच समाजाला झाले; मात्र या दु:खात राहण्यापेक्षा त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मी बाहेर पडली आहे. त्यांच्या पश्‍चात समाजाला विश्‍वास देण्यासाठी, संघटित करण्यासाठी ही यात्रा काढली असून, आता संघटित व्हा आणि हे आघाडी सरकार उलथून टाका, असे आवाहन त्यांनी केले. वाढती गुन्हेगारी, विकासाचा अनुशेष, शेतकर्‍यांच्या आत्महत्या अशा अनेक आघाड्यांवर राज्य सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे मुंडे साहेबांच्या स्वप्नपूर्तीचे दिवस जवळ आले असून, आघाडी सरकारला एकएक मताचा दुष्काळ पडेल, अशी परिस्थिती निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले.भाजप प्रदेशाध्यक्ष दवेंद्र फडणवीस यांनीही आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली. शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबत नाहीत, शेतकर्‍यांसाठी आलेल्या पॅकेजमध्ये भ्रष्टाचार होतो, लाखो कोटींचा सिंचन घोटाळा उघड होतो. या सर्व प्रकारांना लोक कंटाळले असून, महायुतीच्या पाठीशी राहा व हे सरकार उलथून टाका, असे ते म्हणाले. भाजपाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब फुंडकर यांनी मुंडे यांनी काढलेल्या संघर्ष यात्रेची आठवण सांगत, इतिहासाची पुनरावृत्ती होऊन महायुतीची सत्ता येईल, असा आशावाद व्यक्त केला. आ.चैनसुख संचेती यांनी शेरोशायरी सादर करून संघर्ष यात्रेला यश मिळेल व सत्तांतर होईल, असा दावा केला. यात्रेचे समन्वयक सुजीतसिंह ठाकूर यांनी संघर्षयात्रेची पृष्ठभूमी विषद केली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ.संजय कुटे यांनी प्रास्ताविकामध्ये संघर्ष यात्रेची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सभेचे संचालनही केले.