शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
4
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
5
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
6
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
7
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
8
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
9
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
10
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना कांदाचाळ अनुदान तात्काळ सुरु करा, सदाभाऊ खोत यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2024 20:01 IST

Sadabhau Khot : रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक शेतकऱ्यांना कांदाचाळ अनुदान सुरू करणेबाबत रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

मुंबई : रोजगार हमी योजनेतून कांदाचाळ उभारण्यासाठी वैयक्तिक शेतकऱ्यांना अनुदान सुरू होते. परंतु काही दिवसापूर्वी हे अनुदान न देण्याचा धक्कादायक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक शेतकऱ्यांना कांदाचाळ अनुदान सुरू करणेबाबत रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

शासनाच्या आदेशानुसार, यापुढे कांदाचाळ योजनेचा लाभ सामुदायिकरीत्या शेतकरी किंवा स्वयंसहायता बचत गट अथवा शेतकऱ्यांचे उत्पादक गट किंवा शेतकरी संघ लाभ घेऊ शकतील, असे स्पष्ट केले आहे. म्हणजेच यापुढे वैयक्तिक शेतकऱ्यांना कांदाचाळीसाठी अनुदान मिळणार नाही. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील अनेक मतदारसंघात कांद्याचा मुद्दा गाजला होता. 

त्यामुळे 'रोहयो कांदाचाळ' अनुदानातून वैयक्तिक शेतकऱ्यांना वगळल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड मोठा नाराजीचा सूर उमटला आहे. या अनुषंगाने रोजगार हमी योजनेतून वैयक्तिक शेतकऱ्यांना तात्काळ कांदाचाळ अनुदान सुरू करावे, या मागणीसाठी आज सदाभाऊ खोत यांनी मुख्यमत्र्यांकडे आणि उप मुख्यमत्र्यांकडे निवेदन दिले.

दरम्यान, रोजगार हमी योजने अंतर्गत राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा चाळ बांधण्यासाठी राज्य सरकारकडून ५० टक्के अनुदान दिले जात होते. मात्र, राज्य शासनाच्या नवीन परीपत्रकानुसार आता हे अनुदान शेतकऱ्यांना वैयक्तिक स्वरूपात दिले जाणार नाही. तर केवळ बचत गट, शेतकऱ्यांचा समूह, शेतकरी उत्पादक संघ यांनाच आता हे अनुदान मिळणार आहे. कांदा पिकाच्या साठवणुकीसाठी मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी हे कांदा चाळ बांधतात. 

काय आहे कांदा चाळ अनुदान योजना?कांद्याची साठवणूक करता यावी, यासाठी महाराष्ट्र शासनाने १८ मे २०२३ रोजी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून कांदा चाळ उभारण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय निर्णय घेतला होता. या योजनेतून कांदा चाळ उभारण्यासाठी मजुरी म्हणून ९६ हजार २२० रुपये व बांधकामाच्या साहित्यासाठी ६४ हजार १४७ अशी एकूण १ लाख ६० हजार ३६७ रुपये इतकी रक्कम सरकारकडून दिली जात होती. तर, या योजनेचा शेतकरी स्वतः वैयक्तिकरित्या व सामुदायिक स्तरावरही बचत गट, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक संघ यांच्या मार्फत देखील लाभ घेऊ शकत होते. 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Eknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्रonionकांदा