शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

एसटी होणार ६६ वर्षांंची

By admin | Updated: May 25, 2014 00:55 IST

१ जून १९४८ ला पहिली फेरी धावलेल्या एसटीचा वटवृक्ष अख्या महाराष्ट्रभर डौलाने उभा झाला आहे. ६६ वर्षांंच्या सेवेने एसटीने प्रवाशांच्या मनात घट्ट स्थान निर्माण केले. त्यामुळेच एसटीच्या

१ जूनला वर्धापनदिन : रोशनाई, प्रवाशांचे स्वागत

दयानंद पाईकराव - नागपूर

१ जून १९४८ ला पहिली फेरी धावलेल्या एसटीचा वटवृक्ष अख्या महाराष्ट्रभर डौलाने उभा झाला आहे. ६६ वर्षांंच्या सेवेने एसटीने प्रवाशांच्या मनात घट्ट स्थान निर्माण केले. त्यामुळेच एसटीच्या गौरवशाली इतिहासावर यानिमित्ताने प्रकाश टाकण्यात येणार आहे. होय, संपूर्ण महाराष्ट्रभरातील बसस्थानकांवर रोशनाई, सजावट, प्रवाशांचे स्वागत असा उत्सव साजरा करण्यात येणार आहे ते ६६ व्या ‘वर्धापनदिना’च्या निमित्ताने.

गावखेड्यात जाणारी, अपंग, शाळकरी मुलांना सवलतीत शाळेत पोहोचविणारी, अंध-अपंग, ज्येष्ठ नागरिकांना सवलत देणारी, कधी लग्नप्रसंगी दारात उभी राहणारी सर्वांंंची लाडकी एसटी बस आगामी १ जूनला ६६ वर्षांंची होत आहे. महाराष्ट्रात एसटी महामंडळाची स्थापना झाली तेव्हा पहिली फेरी १ जून १९४८ रोजी धावली. त्या घटनेला ६६ वर्षांंंचा कालावधी पूर्ण होत आहे. एसटी महामंडळाच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकण्यासाठी हा उत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा करण्याचा निर्धार महामंडळाने केला आहे.

त्यानिमित्त राज्यातील सर्व बसस्थानकांवर सजावट करण्यात येणार आहे.

रोशनाई करून प्रवेशद्वारावर रांगोळी काढून प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्याची योजनाही महामंडळाने आखली आहे. ६६ वर्षांंंच्या एसटी महामंडळाच्या गौरवशाली इतिहासावर प्रकाश टाकण्यात येणार असून यात महामंडळाने समाजातील विविध घटकांसाठी सुरू केलेल्या योजनांची माहिती देण्यात येणार आहे. खाजगी प्रवासी वाहतुकीच्या तुलनेत एसटी महामंडळाची सेवा सुरक्षित आहे. खाजगीच्या तुलनेत महामंडळाच्या अपघातांचे प्रमाण फक्त १ टक्का आहे.

यामुळेच सुरक्षित प्रवासासाठी आजही प्रवासी एसटी बसने प्रवास करण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे महामंडळाच्या गौरवशाली इतिहासाची माहिती प्रवाशांना देण्याच्या सूचना राज्यभरातील विभाग नियंत्रकांना देण्यात आल्या आहेत.

चित्ररथही राज्यभर फिरणार

एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी असलेल्या सुविधा, महामंडळाची माहिती प्रवाशांना व्हावी यासाठी राज्यातील विविध विभागात चित्ररथ तयार केले आहेत. महामंडळाला १ जूनला ६६ वर्ष पूर्ण होणार आहेत. यानिमित्ताने हा चित्ररथ संपूर्ण राज्यभरात फिरविण्याचा निर्णयही महामंडळाच्या प्रशासनाने घेतला आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून प्रवाशांसाठी असलेल्या विविध सवलतींची माहिती त्यांना पुरविण्यात येणार आहे.