शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
2
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
3
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
4
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
5
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
6
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
7
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
8
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
9
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
10
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
11
ठेकेदाराच्या निष्काळजीपणाने चव्हाण कुटुंबाचा 'आधार' गेला; क्रेन पडून पोलिसाचा मृत्यू
12
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
13
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
14
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
15
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
16
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
17
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
18
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
20
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

एसटी पूर्ण क्षमतेने सुरू; पण, प्रवाशांची पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 07:23 IST

अनिल परब; पाच महिन्यांत ३,५०० कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात सध्या १०० टक्के क्षमतेने एसटी वाहतूक सुरू करण्यात आली आहे; पण प्रवासी अजूनही प्रवासासाठी धजावत नाहीत, असे परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांनी सांगितले.कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे एसटीची चाकेही थांबली. आधीच आर्थिक संकटात असलेल्या एसटीच्या तोट्यात आणखी भर पडली. २० आॅगस्टपासून ५० टक्के क्षमतेने राज्यांतर्गत एसटी सेवा सुरू झाली. त्यानंतर १७ सप्टेंबरपासून १०० टक्के क्षमतेने एसटी वाहतूक सुरू केली आहे. परिवहनमंत्री म्हणाले, राज्यात एसटी पूर्ण क्षमतेने सुरू झाली असली तरी प्रवासी अजूनही प्रवासास धजावत नाहीत.कोरोनाचा भत्ता द्यायचा शिल्लक आहे, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मदत देणे बाकी आहे, हे लवकर आम्ही देऊ असेही त्यांनी सांगितले. एसटी कोरोनामुळे आर्थिकदृष्ट्या प्रचंड अडचणीत आली आहे. ५ हजार कोटी रुपये संचित तोटा असणाऱ्या एसटीला कोरोना काळात गेल्या पाच महिन्यांमध्ये तिकीट विक्रीतून मिळणाºया हक्काच्या ३५०० कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे.एकूण महसुलाच्या तिकीट विक्रीच्या माध्यमातून ९८ टक्के महसूल एसटीला प्राप्त होतो. परंतु सध्या प्रवाशांचा ओघही कमी असल्याने अडचणीत आणखी भर पडली आहे.राज्य सरकारकडे २२०० कोटींची मागणीएसटीला दोन महिने उत्पन्न नसले तरी राज्य सरकारकडून ५०० कोटी रुपये घेऊन पगार दिले होते. आताही आम्ही राज्य सरकारकडे २२०० कोटींची मागणी केली आहे. इंधन, पगार, सुटे भाग यासाठी पैसे मागितले आहेत. यातील ५५० कोटी मिळाले असून उर्वरित लवकरच मिळतील, असे परिवहनमंत्री म्हणाले.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसstate transportएसटी