शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
'Welcome my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
3
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
4
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
5
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
6
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
7
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
8
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
9
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
10
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
11
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
12
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
13
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
14
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
15
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
16
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
17
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
18
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
19
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
20
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
Daily Top 2Weekly Top 5

शहापूरमध्ये तिहेरी अपघात; विशेष सरकारी वकील अजय मिसर थोडक्यात बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 00:17 IST

महामंडळाची बस, कंटेनर अन् कारचा तिहेरी अपघात

नाशिक:  नाशिकहून मुंबईकडे रात्रीच्या सुमारास इनोव्हा कारमधून निघालेले विशेष सरकारी वकील अजय मिसर यांच्या कारला शहापूर येथील पुलावर भीषण अपघात झाला. या अपघातात त्यांच्या कारसह वाहनांचा चक्काचूर झाला असून  मिसर हे सुदैवाने बचावले. सोबत असलेल्या सुरक्षारक्षकांनादेखील गंभीर मार लागला नसल्याचे मिसर यांनी लोकमत'शी बोलताना सांगितले. या भीषण अपघातात बसमधील 3 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे.

शुक्रवारी उच्च न्यायालयात होणाऱ्या एका खटल्याच्या सुनावणीसाठी मिसर यांना हजर राहायचे होते. त्यामुळे नाशिक येथून मिसर हे त्यांच्या खासगी  ईनोवा कारमधून (एम.एच15 डी एम 3937) मुंबईच्या दिशेने रात्री दहा वाजेच्या सुमारास सुरक्षारक्षक यांना घेऊन मार्गस्त झाले.

शहापूर पुलावर मुंबईकडून नाशिकच्या दिशेने भरधाव जाणारी महामंडळाची शिवशाही बस दुभाजक तोडून विरुद्ध बाजूला मुंबई लेनवर येऊन उलटली. त्यामुळे या लेनवरून मार्गस्त होत असलेला कंटेनर त्या बसवर जाऊन आदळला आणि या दोन्ही वाहनांचा अचानक अपघात झाल्यामुळे मिसर यांच्या कारच्या चालकाचेही नियंत्रण सुटले. मात्र त्याने शेवटपर्यंत प्रयत्न करत कारचा वेग आटोक्यात आणला. तरीही कार कंटेनर आणि पुलाच्या कठड्याच्या मध्ये जाऊन धडकली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये मिसर यांच्या कारसह कंटेनरचा चक्काचूर झाला. दैव बलवत्तर असल्याने या भीषण अपघातातून मिसर व त्यांचे सुरक्षारक्षक आणि कारचालक थोडक्यात बचावले. त्यांना किरकोळ स्वरूपाचा मार लागला आहे. मिसर यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी कारमधील सर्व सहकारी व ते स्वतः या दुर्घटनेत सुखरूप असल्याचे सांगितले. रात्री 11 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडल्याचे त्यांनी सांगितले.

"आम्ही सगळे सुखरूप आहोत, कोणालाही गंभीर मार लागलेला नाही, त्यामुळे कोणीही काळजी करु नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अफवा पसरवू नये, आम्ही सगळे पुन्हा नाशिकच्या दिशेने माघारी परतत आहोत" - अजय मिसर, विशेष सरकारी वकील, नाशिक