शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता दिसू लागताच शिवसेनेत खदखद

By admin | Updated: December 2, 2014 09:08 IST

सुभाष देसाई यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याकरिता विधान परिषदेची एक जागा शिवसेनेने भाजपाकडे मागून घेतली आहे. संभाव्य मंत्री म्हणून सुभाष देसाई, दि

मुंबई : शिवसेनेला चार कॅबिनेट व आठ राज्यमंत्रीपदे देण्याची तयारी भाजपाने दाखवली असून सत्तेत सहभागी होण्यास शिवसेना जवळपास राजी झाली आहे, पण मंत्रिमंडळातील समावेशावरून शिवसेनेत असंतोषाचा उद्रेक होण्याची चिन्हे आहेत.राज्य मंत्रिमंडळात आपला समावेश होणार किंवा कसे याबाबत माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम हे साशंक असल्याने त्यांनी सत्तेतील सहभागाबाबत शिवसैनिकांचे मत अजमावून पाहण्याचा सल्ला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला होता. तर दुसरीकडे, विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे यांना वाटाघाटीत कुठेच सहभागी करून घेण्यात न आल्याने तेही नाराज झाले आहेत. शिंदे यांना चर्चेत सहभागी करून न घेता विदर्भातील दुष्काळी दौऱ्यावर धाडण्यात आले आहे. सुनील प्रभू यांच्या संभाव्य समावेशामुळे रवींद्र वायकर हे अस्वस्थ आहेत.सुभाष देसाई यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्याकरिता विधान परिषदेची एक जागा शिवसेनेने भाजपाकडे मागून घेतली आहे. संभाव्य मंत्री म्हणून सुभाष देसाई, दिवाकर रावते, डॉ. नीलम गोऱ्हे, डॉ. दीपक सावंत या विधान परिषद सदस्यांच्याच नावाची चर्चा असल्याने विधानसभेत दोन-तीन टर्म निवडून येणाऱ्या आमदारांनी काय करायचे, अशी खदखद सेनेत आहे. राज्य मंत्रिमंडळात समावेश करताना प्रादेशिक व जातीय समतोल विचारात न घेता केवळ मुंबईतील नेत्यांचा व आमदारांचा समावेश झाल्यास शिवसेनेत नाराजी उफाळून येईल, असे काहींचे मत आहे. मराठवाड्यातून अर्जुन खोतकर, पश्चिम महाराष्ट्रातून राजेश क्षीरसागर आणि विदर्भातून संजय राठोड यांना संधी मिळणार की नाही, अशी विचारणा होत आहे. (विशेष प्रतिनिधी)

---------------

भाजपा-सेनेत रात्री खलबतेराज्यातील सत्तेत सहभागी होण्यास शिवसेना जवळपास राजी झाल्याचे वृत्त असून मंत्रिपदांच्या वाटपाबाबत मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर भाजपा व सेनेत सोमवारी रात्री पुन्हा खलबते सुरू झाली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे आणि सेनानेते सुभाष देसाई व खा. अनिल देसाई यांच्यात चर्चा झाली. मात्र मंत्रिपदाच्या वाटपावर सहमती झाली का नाही, हे कळू शकले नाही.