शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

सौर पंप किफायत असावेत

By admin | Updated: December 17, 2014 00:32 IST

शेतकऱ्यांना ५ लक्ष सौर कृषिपंप देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील महत्त्वाकांक्षी योजनेला सौर ऊर्जा क्षेत्रातील सर्वच प्रमुख उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : ५ लक्ष सौर कृषिपंपांची संकल्पनानागपूर : शेतकऱ्यांना ५ लक्ष सौर कृषिपंप देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील महत्त्वाकांक्षी योजनेला सौर ऊर्जा क्षेत्रातील सर्वच प्रमुख उद्योजकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सौरऊर्जेवरील कृषिपंपांच्या निर्मितीसाठी तसेच प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर बसविण्यासाठीचे सादरीकरण उद्योगसमूहाने मुख्यमंत्र्यांसमोर केले. रामगिरी या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मंगळवारी देशातील प्रमुख सौरऊर्जा निर्मिती करणाऱ्या उद्योग समूहाच्या सादरीकरणानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना सौरऊर्जेवरील कृषिपंप उपलब्ध करून देण्यासाठी दीर्घकालीन कार्यक्रम राबविण्यात येत असून, शेतकऱ्यांना सिंचनासाठी जास्तीत जास्त उपयोग होईल, तसेच ५ हॉर्स पॉवरपर्यंतचा कृषिपंप अत्यंत किफायतशीर दरात उपलब्ध व्हावेत, यादृष्टीने संशोधन करण्याची सूचना केली. यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ऊर्जा विभागाचे अप्पर मुख्य सचिव अजय मेहता, मेडाचे प्रधान सचिव आनंद लिमये, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, मराठवाडा चेंबर आॅफ कॉमर्सचे राम भोगले तसेच अपारंपरिक ऊर्जानिर्मिती क्षेत्रातील उद्योजक उपस्थित होते. राज्यातील ५ लक्ष शेतकऱ्यांना सौर कृषिपंप देण्याच्या संकल्पनेची केंद्र सरकारनेही दखल घेतली असून, जिल्हानिहाय तसेच तालुकानिहाय सौर कृषिपंपाचे समूह विकसित करण्यात येईल. सध्या ५ हॉर्सपॉवर पंपासाठी ६ लक्ष ५० हजार खर्च येत असून, हा खर्च ३ लक्ष ५० हजार रुपयांपर्यंत आणण्यासाठी उद्योग समूहाने संशोधन करावे, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. महसूल विभागातर्फे सर्वेक्षण करून ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करावा.अजय मेहता म्हणाले की, शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध व्हावी तसेच त्यांना सौरपंप देताना अनुदान, शेतकरी आणि बँकेचा सहभाग निश्चित करण्यासाठी सौरऊर्जा पंपाची किंमत आणि दुरुस्ती तसेच देखभालीचे धोरण निश्चित करण्याच्या अनुषंगाने उद्योजकांनी प्रस्ताव सादर करावेत.यावेळी सौरऊर्जा निर्मिती क्षेत्रातील सनएडिसन या उद्योग समूहाचे अध्यक्ष पशुपती गोपालन, किर्लोस्कर उद्योग समूहातर्फे शिप्रा त्रिपाठी व अजय शिरोळकर, जैन सोलरतर्फे अनिल जैन, शक्ती सौरऊर्जा निर्मिती क्षेत्रातील उद्योग समूहाचे पाटीदार, आयडीबीआय बँकेतर्फे बोंगीरवार यांनीही सादरीकरण केले.यावेळी मेडाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक व्ही.एम. पांडे, हेमंत कुळकर्णी, विकास दाभाडे, अतुल फडके, विवेक देशपांडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)