शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट फोन, इंटरनेटपासून ग्रामस्थ दूरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2017 02:13 IST

‘कॅशलेस’ला जिल्ह्यात जनतेचा पाठिंबा मिळतो आहे़ मात्र, मूलभूत सोयींपासून कोसो दूर असलेल्या गावागावांमध्ये त्याची अंमलबजावणी करणे अवघड होत आहे.

‘कॅशलेस’ला जिल्ह्यात जनतेचा पाठिंबा मिळतो आहे़ मात्र, मूलभूत सोयींपासून कोसो दूर असलेल्या गावागावांमध्ये त्याची अंमलबजावणी करणे अवघड होत आहे. लातूर जिल्ह्यातील संगाचीवाडी (ता़चाकूर) येथील ग्रामस्थांनीही ‘कॅशलेस’चे कौतुक केले़, पण तांत्रिकदृष्ट्या आणखी सुविधांची ग्रामस्थांना प्रतीक्षा आहे. गावात स्मार्ट फोन वापरणाऱ्यांची संख्या जेमतेम १० टक्के आहे़ सर्वच मोबाइल आॅपरेटर्सच्या नेटवर्कचे जाळे गावापर्यंत पसरल्याने नेट कनेक्टिव्हिटी आहे़ मात्र, बहुतांश नागरिक शेती व शेतीशी संबंधित व्यवसायात असल्याने स्मार्ट फोन, इंटरनेटपासून गावकरी बरेच दूर आहेत़गाव : संगाचीवाडी (ता़ चाकूर जि़ लातूर)लोकसंख्या : ६०० लातूरपासूनचे अंतर : ५५ किलोमीटरबँकांची संख्या : एकही नाहीडाक कार्यालय : नाहीएटीएम : नाहीवाहतूक सुविधा : बस, खाजगी वाहनेस्मार्टफोनधारकांची संख्या : ५५ साक्षरतेचे प्रमाण : ८० टक्केइंटरनेट सुविधा : फक्त मोबाईल नेटवर्कद्वारे आहे़ कनेक्टिव्हिटी चांगलीवीजपुरवठा : १८ तास, ६ तासांचे भारनियमन, एका आठवड्यात पहाटे ४ ते सकाळी १० पर्यंत तर दुसऱ्या आठवड्यात सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंतकॅशलेस व्यवहार : बोटावर मोजण्याइतकेच लोक शहरात डेबिट कार्डद्वारे असे व्यवहार करीत आहेत़गावात अजूनही ९० टक्क्यांहून अधिक लोकांना तंत्रज्ञान माहीत नाही़ अनेकांचा बँकेशी संबंध आला नाही़ हाती चार पैसे आगाऊ असतील, तेव्हाच या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न गावात असतो़ - बालाजी वाडकर, जमीन खरेदी-विक्री व्यावसायिक, संगाचीवाडी आम्ही कॅशलेस व्यवहार करण्यासाठी तयार आहोत़, परंतु आमच्याकडे येणारे बहुतांश ग्राहक कॅशलेसबाबत अनभिज्ञ आहेत़ त्यांची जनजागृती केल्यासच योजना तडीस जाऊ शकते़-सिद्धेश्वर वाडकर, किराणा दुकानदार, संगाचीवाडी नोटाबंदीपासून व्यवसाय अर्ध्यावरच आला आहे़ कॅशलेस काय हेच माहिती नाही. इंग्रजी व तंत्रज्ञानापासून आम्ही खूप दूर आहोत़ त्यामुळे असे व्यवहार सुरू झाल्यास दुकान बंद करण्यावाचून पर्याय नाही़- देविदास बिरादार, किराणा दुकान व्यावसायिक, संगाचीवाडी शेती आधीच संकटात आहे़ शेतमाल विक्रीतून येणारे पैैसे कर्ज, उधार-उसणवारीत संपून जातात़ बँकेत खाते आहे़ मात्र, व्यवहार कधी केला नाही़ हे खाते केवळ अनुदानापुरते वापरात आहे़ शेतकऱ्याला ‘डिजिटल’ होणे कसे परवडणार? - गंगाधर घुमे, शेतकरी, संगाचीवाडी यापूर्वी क्वचितप्रसंगी कॅशलेस व्यवहार करीत होतो़, परंतु नोटाबंदीपासून मी डेबिट कार्डाद्वारे कॅशलेस व्यवहार करीत आहे़ ही सुटसुटीत प्रक्रिया आहे़ तयार असलो, तरी गावे कॅशलेस होण्यात अडचणी आहेत़-किरण वाडकर, शेतकरी, संगाचीवाडी.