शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या वाहनांना टोलमुक्ती!

By admin | Updated: June 2, 2015 04:19 IST

राज्यात सरसकट टोलमुक्ती न करता कार, जीप, एसटी बस व स्कूलबस अशा लहान वाहनांना सर्व टोलनाक्यांवर लवकरच सूट दिली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई : राज्यात सरसकट टोलमुक्ती न करता कार, जीप, एसटी बस व स्कूलबस अशा लहान वाहनांना सर्व टोलनाक्यांवर लवकरच सूट दिली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. १ जूनपासून राज्यातील १२ टोलनाके कायमस्वरूपी बंद, तर ५३ टोलनाक्यांवर लहान वाहनांना टोलमुक्ती मिळाली आहे. त्याकरिता दरवर्षी ४२५ कोटी रुपये याप्रमाणे २०४० सालापर्यंत ९ हजार कोटी रुपये राज्य सरकार टोल कंत्राटदारांना मोजणार आहे. आता कोल्हापूर येथील नऊ तर मुंबई एंट्री पॉइंटचे पाच टोलनाके येथे छोट्या वाहनांना टोल भरावा  लागत आहे. मुंबई एंट्री पॉइंटचे पाच टोलनाके पूर्णपणे बंद करायचे झाले तर दरवर्षी ३ हजार कोटी रुपये सरकारला द्यावे लागतील. त्यामुळे या टोल नाक्यांवर छोट्या वाहनांना टोलमाफी द्यायची झाली तर दरवर्षी ८०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सरकारला सोसावा लागेल, असे सांगितले जाते. मात्र हा भार कमी असल्यास तात्काळ छोट्या वाहनांचा टोल बंद केला जाईल, असे पाटील म्हणाले. छोट्या वाहनांना टोलमुक्तीटोलमाफीचा मार जनतेलाचसार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे रस्ते बांधणी, दुरुस्ती याकरिता मागील आर्थिक वर्षापर्यंत २९०० कोटी रुपये तरतूद केली जात होती. यंदा ही तरतूद ८०० कोटी रुपयांनी वाढवून ३७०० कोटी केली. ५३ टोल नाक्यांवर छोट्या वाहनांना टोलमाफी दिल्यावर लागणारे ४२५ कोटी पुरवणी मागणीद्वारे मिळावेत याकरिता प्रयत्न सुरु आहे. मात्र वित्त खाते वाढलेल्या तरतुदीमधून हा खर्च भागवण्याचा आग्रह धरीत आहे. वित्त खात्याचे मत मान्य झाले तर शेवटी रस्ते विकासाची तरतूद टोलमाफीकरिता कंत्राटदारांना द्यावी लागेल, अशी शक्यता दिसत आहे. (विशेष प्रतिनिधी)