महाराष्ट्रातील सहा जणांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान

By Admin | Updated: May 26, 2014 14:17 IST2014-05-26T12:26:55+5:302014-05-26T14:17:46+5:30

नरेंद्र मोदी आज सायंकाळी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असून च्या मंत्रीमंडळात महाराष्ट्रातील सहा जणांना संधी मिळत असल्याने राज्यातही आनंदाचे वातावरण आहे.

Six people from Maharashtra rank in Modi's cabinet | महाराष्ट्रातील सहा जणांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान

महाराष्ट्रातील सहा जणांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. २६ -  सोमवारी सायंकाळी अनेक दिग्गज नेते तसेच सार्क देशांच्या प्रमुखांच्या उपस्थितीत भारताचे १५ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेण्यास नरेंद्र मोदी सज्ज झाले असून त्यांच्या मंत्रीमंडळात महाराष्ट्रातील सहा जणांना संधी मिळत असल्याने राज्यातही आनंदाचे वातावरण आहे. भारतीय जनता पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी (भूपृष्ठ-वाहतूक), गोपीनाथ मुंडे, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, रावसाहेब दानवे व अनंत गीते अशी या सहा नेत्यांची नावे असून इतर पाच जणांना कोणते मंत्रीपद मिळेल हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी मोदींसह २३ जण कॅबिनेट मंत्री म्हणून तर १८ जण राज्यमंत्री म्हणून शपथ घेतील. 

Web Title: Six people from Maharashtra rank in Modi's cabinet