शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कुटुंबातील सहा जणांची आत्महत्या

By admin | Updated: June 29, 2016 05:25 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू असतानाच विदर्भात एकाच कुटुंबातील सहा जणांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी घडली.

अंजनगाव सुर्जी (अमरावती) : शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू असतानाच विदर्भात एकाच कुटुंबातील सहा जणांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी दुपारी घडली. मृतांमध्ये चार भावंडं आणि त्यांच्या दोन भाच्यांचा समावेश आहे. या कुटुंबातील सर्व सदस्य अविवाहित होते, त्याच नैराश्यातून त्यांनी जीवन संपवले असावे, अशी चर्चा आहे. चव्हाण कुटुंबाचे राहत्या घराशेजारीच किराणा दुकान असून, ‘बिट्टीबाईचे दुकान’ म्हणून ते अंजनगावात प्रसिद्ध आहे. मृत लक्ष्मी व मंगला यांची आई उषाबाई बारड या याच परिसरात काही अंतरावर मुलगा रोशनसह राहतात. मंगळवारी दुपारपर्यंत चव्हाण यांचे किराणा दुकान व घर उघडले नाही. त्यामुळे शेजाऱ्यांना शंका आली. त्यांनी रोशनला याची माहिती दिली असता त्याने घरात वरून प्रवेश केला. आतील दृश्य पाहून तो नि:शब्द झाला. थोड्या वेळाने हंबरडा फोडत तो घराबाहेर आला. त्यानंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा झाले. घरात दोन महिला, दोन मुलींसह दोन पुरुष मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या शेजारी मोनोक्रोटोफॉस नामक विषारी औषधांच्या दोन बाटल्या आढळल्या. घटनेचे वृत्त परिसरात वाऱ्यासारखे पसरताच घटनास्थळी बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती. घटनेमागचे कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)> मृतांमध्ये प्रफुल्ल नारायण चव्हाण (४८), विवेक नारायण चव्हाण (४०), लक्ष्मी नारायण चव्हाण (५०), मंगला नारायण चव्हाण (५२) ही बहीणभावंडे आणि कामिनी अरूण बारड (२९) व रोशनी अरूण बारड (२६) या दोन भाची यांचा समावेश आहे. या घटनेने अंजनगाव सुर्जी हादरून गेले आहे.