‘श्याम मानव मानसिक रुग्ण’

By Admin | Updated: October 20, 2015 00:21 IST2015-10-20T00:21:00+5:302015-10-20T00:21:00+5:30

सनातन संघटनेवर आरोप करणाऱ्या श्याम मानव यांना मानसिक रोग झाला आहे. केवळ प्रसिद्धीसाठी असे आरोप करणाऱ्या मानव यांच्याकडे दुर्लक्ष करणे, हाच उपाय असल्याचे

'Shyam Mana mental sickness' | ‘श्याम मानव मानसिक रुग्ण’

‘श्याम मानव मानसिक रुग्ण’

सांगली : सनातन संघटनेवर आरोप करणाऱ्या श्याम मानव यांना मानसिक रोग झाला आहे. केवळ प्रसिद्धीसाठी असे आरोप करणाऱ्या मानव यांच्याकडे दुर्लक्ष करणे, हाच उपाय असल्याचे सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत म्हटले. दरम्यान, पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांनी केवळ पुरस्कार परत न करता कोट्यातून मिळालेली घरेही परत करावीत, असेही ते म्हणाले.
सनातन संस्थेवर होत असलेल्या विविध आरोपांच्या पार्श्वभूमीवर वर्तक यांनी या वेळी भूमिका मांडली. ते म्हणाले की, सनातन संस्थेच्या हिटलिस्टवर आता मुख्यमंत्री फडणवीस असल्याचे मत मानव यांनी मांडले असून, प्रसिद्धीच्या हव्यासापोटी त्यांच्याकडून आरोप होत आहेत. त्यांना मानसिक रोग झाल्याचीच ही लक्षणे आहेत. यापूर्वीही त्यांच्याकडून संमोहनाचा मुद्दा चर्चेत आणण्यात आला होता. त्यांना आता विश्रांतीची गरज असून, त्यांच्या विधानांकडे आणि त्यांच्याकडे आता मनोरुग्ण म्हणून दुर्लक्ष करणे, हाच उपाय आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 'Shyam Mana mental sickness'